Car Thief: वर्षाला चोरायचा 185 कार, 27 वर्षे हाच केला उद्योग, अनेकांचे मर्डरही, गडगंज प्रॉपर्टी, जाणून घ्या देशातील सर्वात मोठ्या कारचोराबाबत

पकडण्यात आलेला अनिल चौहान हा देशातील सर्वात मोठा कार चोर होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. त्याने 27 वर्षांत 5  हजार कार चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच वर्षाला तो सरासरी 185  कार चोरी करीत होता.

Car Thief: वर्षाला चोरायचा 185 कार, 27 वर्षे हाच केला उद्योग, अनेकांचे मर्डरही, गडगंज प्रॉपर्टी, जाणून घ्या देशातील सर्वात मोठ्या कारचोराबाबत
5000 कार चोरणारा अटकेतImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 9:24 PM

दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या कार चोराला  (Big Car Thief)अखेरीस अटक करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्या मागावर पोलीस होते. अखेरीस आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अनिल चौहान असं या देशातील सर्वात मोठ्या कार चोराचं नाव आहे. त्याच्या नावावर 5000 कार चोरींचे (5000 car theft) गुन्हे दाखल आहेत. 52 वर्षांच्या अनिल चौहान याने या कार चोरींच्या पैशातून दिल्ली, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यात अनेक मालमत्ता (Property in Mumbai and Delhi)खरेदी केल्या होत्या. अत्ंयत चैनीत तो जीवन जगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला 3 बायका आहेत आणि सात मुले आहेत.

देशातील सर्वात मोठा कार चोर

पकडण्यात आलेला अनिल चौहान हा देशातील सर्वात मोठा कार चोर होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. त्याने 27 वर्षांत 5  हजार कार चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच वर्षाला तो सरासरी 185  कार चोरी करीत होता. सेंट्रल दिल्ली पोलिसांना त्याच्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर देशबंधू गुप्ता रोडवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सहा बंदुका आणि सात काडतुसे जप्त केली आहेत.

कार चोरीच्या वेळी टॅक्सी ड्रायव्हरांची केली हत्या

दिल्लीच्या खानपुरा परिसरात राहत असलेला अनिल आधी रिक्षा चालवण्याचे काम करीत होता. 1995 नंतर त्याने कार चोरण्यास सुरुवात केली. २७ वर्षांत त्याने सर्वाधिक कार या मारुती 800 मॉडेलच्या चोरल्या आहेत. अनिल देशातील वेगवेगळ्या परिसरातून कार चोरुन त्यांना नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात पाठवीत होता. या चोरीसाठी त्याने अनेक टॅक्सी ड्रायव्हरांचे बळीही घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर तो असामला शिफ्ट झाला. कार चोरीतून मिळवलेल्या पैशांतून त्याने दिल्ली, मुंबई आणि पूर्वोत्तर राज्यांत मालमत्ता खरेदी केल्या. तो आसाममध्ये जाऊन सरकारी कॉन्ट्रॅक्टर झाला. तिथे तो स्थानिक नेत्यांच्याही संपर्कात होता.

मनी लाँड्रिंग आणि हत्यारांच्या तस्करीतही सामील

कारचोरीतील हा आरोपी सध्या हत्यारांच्या तस्करीत सामील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातून हत्यारे आमून ती पूर्वोत्तर राज्यात बंदी असलेल्या संघटनांना पुरवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ईडीने त्याच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे.

अनेकदा अटकेत

अनिलला यापूर्वीही अनेकदा अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2015 साली त्याला एकदा काँग्रेस आमदारासोबत अटक करण्यात आली होती. त्यावेळी पाच वर्षे तो जेलमध्ये होता. 2020 साली त्याची सुटका करम्यात आली. त्याच्याविरोधात 180 गुन्हे दाखल आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.