Photo Story: नियम डावलून कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे दफन, त्यानंतर 21 जणांचा मृत्यू; ‘या’ गावाची झोप उडाली

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात कोरोना नियमांचे पालन न करताच कोरोनाबाधिताचा मृतदेह दफन करण्यात आला. (21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Photo Story: नियम डावलून कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे दफन, त्यानंतर 21 जणांचा मृत्यू; 'या' गावाची झोप उडाली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 9:31 AM

जयपूर: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात कोरोना नियमांचे पालन न करताच कोरोनाबाधिताचा मृतदेह दफन करण्यात आला. त्यानंतर अवध्या 21 दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, 15 एप्रिल ते 5 मे दरम्यान केवळ चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. (21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Rajasthan Village

Rajasthan Village

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी सीकर जिल्ह्यातील खीरवा गावात एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह आणण्यात आला होता. यावेळी 150 लोकांनी त्याच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचं पालन न करताच या मृतदेहाचे दफन करण्यात आले. प्लास्टिकच्या थैलीमधून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. अनेक जणांनी या मृतदेहाला हात लावल्याचेही सांगण्यात येते.

Rajasthan Village

Rajasthan Village

सीकरच्या या खीरवा गावात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यातील केवळ तीन ते चार जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. बहुतेकांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही गावातील मृत्यूंची चौकशी केली. गावातील 147 सदस्यांचे स्वॅब घेतले. या सँपलची तपासणी करण्यात येईल. त्यातून या लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला की इतर काही कारणाने झाला याची माहिती मिळेल, असं लक्ष्मण गढचे उप-विभागीय अधिकारी कुलराज मीणा यांनी सांगितलं.

Rajasthan Village

Rajasthan Village

प्रशासनाने गावात स्वच्छता अभियान राबवलं आहे. ग्रामस्थांना या समस्येचं गांभीर्य समजावून सांगितलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत आहे, असं मीणा यांनी सांगितलं. स्थानिक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे. त्यानंतरच या प्रकरणावर भाष्य करता येईल, असं सीकरचे मुख्य आरोग्य अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितलं.

Rajasthan Village

Rajasthan Village

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या मतदारसंघात खीरवा गाव येते. त्यांनीच या मृतदेहाच्या दफनानंतर 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. नंतर त्यांनी ही माहिती सोशल मीडियातून काढून टाकली होती. (21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Rajasthan Village

Rajasthan Village

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : पिंपरी चिंचवडमध्ये ‘रेमडेसिव्हीर’ काळ्या बाजारात विकताना तिघांना अटक

“खडकवासला जवळ गाडी लावून आत्महत्या करतोय, गाडी विकून येणारे पैसे आईला द्या”

LIVE | प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले? शिवसेनेचा सवाल

(21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.