सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 24 रुग्णांचा मृत्यू; कर्नाटक हादरले

ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. (24 dead in Karnataka hospital due to oxygen shortage)

सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 24 रुग्णांचा मृत्यू; कर्नाटक हादरले
Karnataka
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 1:14 PM

बेंगळुरू: ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. कर्नाटकाच्या एका सरकारी रुग्णालयात रुग्णांना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन उशिराने पोहोचल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. (24 dead in Karnataka hospital due to oxygen shortage)

म्हैसूरच्या चामराज नगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. चामराज नगर रुग्णालयाला बेल्लारीहून ऑक्सिजन मिळणार होतं. मात्र ऑक्सिजन येण्यास विलंब झाला. त्यामुळे ही मोठी घटना घडली आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यू पावलेल्यांमधील सर्वाधिक रुग्ण व्हेटिंलेटरवर होते. ऑक्सिजन संपल्यानंतर ते तडपू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री ही घटना घडली. या रुग्णालयात एकूण 144 रुग्ण उपचार घेत होते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन एकच आक्रोश केला असून या परिसरात वातावरण तंग झालं आहे.

आरोग्यमंत्री घटनास्थळाकडे रवाना

चामराज नगरमधील घटना दुर्देवी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. म्हैसूर, मंड्या आणि चामराज नगर येथे जात आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि काय समस्या आहे याची माहिती घेऊन समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितलं. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आठवडाभरात अनेक मृत्यू

याआधी कालाबुर्गी येथे केबीएन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. याच दिवशी यदगीर येथे वीज गेल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्याभरात कर्नाटकात अनेक रुग्णालयातील रुग्णांचा ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

16 लाख रुग्ण सापडले

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या 16 लाखांच्यावर गेली आहे. त्यातच रविवारी राज्यात 37 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तर 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात कोरोना रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागत आहे. यापूर्वी दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. (24 dead in Karnataka hospital due to oxygen shortage)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : बीडच्या वडवणी शहरातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार

घरातच मृत्यू होण्याचं लोण आता महाराष्ट्रात, कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले

IPL 2021 : के एल राहुल रुग्णालयात, पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाचं ट्विट, म्हणते, ‘राहुल तुला….’

(24 dead in Karnataka hospital due to oxygen shortage)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.