Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूतील तंजावरमध्ये सापडले 500 कोटींचे शिवलिंग, पोलिसांनी केले जप्त

शिवलिंगाचे वजन 530 ग्रॅम आणि उंची 8 सेमी होती. मात्र, त्याचे वडील समियप्पन यांना पुरातन वास्तू कशी आणि कोठून मिळाली, याबाबत अरुणने स्वत: अनभिज्ञ असल्याचा दावा केला आहे. एडीजीपी म्हणाले की, रत्नशास्त्रज्ञांच्या मते या मूर्तीची किंमत 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

तामिळनाडूतील तंजावरमध्ये सापडले 500 कोटींचे शिवलिंग, पोलिसांनी केले जप्त
तंजावरमध्ये जप्त करण्यात आलेले शिवलिंग (सौजन्य : सोशल मीडिया)
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 1:51 AM

तामिळनाडू : तामिळनाडूच्या सीआयडी पोलिसांनी गुरुवारी तंजावरमधील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून 500 कोटी रुपयांचे पन्ना बनवलेले शिवलिंग जप्त केले. एडीजीपी जयंता मुरली यांनी शुक्रवारी चेन्नई येथे पत्रकारांना या कारवाईची माहिती दिली. तंजावरमधील एका घरात पाचूपासून बनवलेले शिवलिंग ठेवले असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानंतर आम्ही तेथे छापा टाकला आणि त्या व्यक्तीच्या बँक लॉकरमधून ते जप्त केले, असे मुरली यांनी सांगितले.

पोलिसांनी अशी केली कारवाई

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. राजाराम आणि पी. अशोक नटराजन यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी तंजावरमधील अरुलानंद नगरच्या 7 व्या चौकात घराची झडती घेतली. त्यांनी एन. ए. सामियप्पन यांचा मुलगा एन. ए. अरुण याच्या घरी चौकशी केली. यादरम्यान अरुणने पोलिसांना सांगितले की, त्याच्या वडिलांनी तंजावरमधील एका बँक लॉकरमध्ये पुरातन पन्ना लिंगम ठेवले होते. नंतर ते तपासासाठी पोलिसांना दिले.

रत्नशास्त्रज्ञांच्या मते मूर्तीची किंमत 500 कोटी रुपये!

शिवलिंगाचे वजन 530 ग्रॅम आणि उंची 8 सेमी होती. मात्र, त्याचे वडील समियप्पन यांना पुरातन वास्तू कशी आणि कोठून मिळाली, याबाबत अरुणने स्वत: अनभिज्ञ असल्याचा दावा केला आहे. एडीजीपी म्हणाले की, रत्नशास्त्रज्ञांच्या मते या मूर्तीची किंमत 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आम्ही धर्मपुरम अधिनियमसारख्या संरक्षकांकडून सत्यापित केले आहे, ज्यांनी मूर्तीच्या किमतीची पुष्टी केली आहे. शास्त्रोक्त विश्लेषण करून ते कोणत्या मंदिराचे आहे हे ओळखावे लागेल, असे एडीजीपींनी पत्रकारांना सांगितले.

प्रत्येक स्तरावर तपास सुरू : पोलीस

नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुकुवलाई येथील शिवमंदिरातून 2016 मध्ये हे शिवलिंग गायब झाले होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सम्यप्पन तपासात सहकार्य करत आहेत. त्या आधारे सर्व पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे. हे शिवलिंग शनिवारी कुंभकोणम न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. (500 crore Shivling found in Thanjavur, Tamil Nadu)

इतर बातम्या

Raju Karemore: आमदार राजू कारेमोरे यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामिन मंजूर

Buldhana : भावाच्या मदतीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण, चौघांना अटक

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.