UP Crime : युपीच्या निवडणूक प्रचारात पैशांचा वापर? कानपूरमध्ये 7 कोटींची रोकड जप्त

पोलिसांनी सर्वप्रथम काकादेव परिसरात सीएमएस कंपनीच्या कारमधून पाच कोटींहून अधिक रोकड जप्त केली. ही रोकड कानपूरच्या केस्को या वीज कंपनीची आहे व ती बँकेत नेली जात होती, असे स्पष्टीकरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. परंतु घटनास्थळी पोलिसांना त्यांच्या या दाव्यासंबंधी कोणताही कागद सापडला नाही.

UP Crime : युपीच्या निवडणूक प्रचारात पैशांचा वापर? कानपूरमध्ये 7 कोटींची रोकड जप्त
मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 11:42 PM

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराला ऐतिहासिक जोश दिसून येत आहेत. अशातच निवडणूक प्रचारात पैशांचा वापर केला जात असल्याचा संशय बळावला आहे. कानपूरच्या काकादेव पोलीस स्टेशन हद्दीत एका व्हॅनमधून 5 कोटी(5 Crore) रुपयांची रोकड जप्त(Siezed) करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वरूप नगर परिसरातूनही 1 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. ठिकठिकाणी टाकल्या जात असलेल्या धाडीदरम्यान रोकड हाती लागत असल्याने पोलिसांनी कारवाईची मोहीम आणखीन तीव्र केली आहे. या प्रकरणी आयकर पथकही तपास करत आहे. (7 crore cash seized from vehicles during investigation in Kanpur, Uttar Pradesh)

तीन ठिकाणांहून रोकड जप्तीची कारवाई

पोलिसांनी सर्वप्रथम काकादेव परिसरात सीएमएस कंपनीच्या कारमधून पाच कोटींहून अधिक रोकड जप्त केली. ही रोकड कानपूरच्या केस्को या वीज कंपनीची आहे व ती बँकेत नेली जात होती, असे स्पष्टीकरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. परंतु घटनास्थळी पोलिसांना त्यांच्या या दाव्यासंबंधी कोणताही कागद सापडला नाही. यानंतर स्वरूप नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुसरी रोकड जप्तीची कारवाई करण्यात आली. येथे कंपनीच्या वाहनातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय 1 कोटी 74 हजार रुपयांची रक्कम सापडली. संबंधित सुरक्षा गाडीत चार कर्मचारी होते.

एटीएमसाठी पैसे घेऊन जात होतो; कर्मचाऱ्याचा कांगावा

जप्त केलेली रक्कम बँकांच्या एटीएमसाठी घेऊन जात असल्याचे कारवाई करण्यात आलेल्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलिसांना घटनास्थळी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. दुसऱ्या एका खासगी वाहनात पोलिसांना जवळपास सहा लाखांची रोकड सापडली आहे. रोख रक्कम जवळ बाळगणाऱ्यांना कोणतीही कागदपत्रे दाखवता आली नाहीत. यादरम्यान सुरक्षा कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कॅमेऱ्यापुढे काहीही सांगितले नाही. आमच्याकडील रोकड अधिकृत असल्याचे सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांबरोबरच आयकर अधिकाऱ्यांकडून तपास

कानपुर शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून सात कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत आम्ही आयकर विभागाला माहिती दिली असून त्यांच्याकडूनही रोख रक्कमेची पडताळणी केली जात आहे. या रक्कमेचा निवडणूक प्रचारात वापर केला जाणार होता का, यादृष्टीने अधिक तपास केला जात आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (7 crore cash seized from vehicles during investigation in Kanpur, Uttar Pradesh)

इतर बातम्या

Vasai Crime : 100 रुपये पडले सांगितले अन् दीड लाख लुटले, वाचा वसईत नेमके काय घडले ?

Nanded Suicide : नांदेडमध्ये दुहेरी आत्महत्या, कौटुंबिक कारणातून गळफास घेत दोन महिलांनी जीवन संपवले

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.