ACB च्या छाप्यात कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याकडून 7 kg सोनं, 15 lakh रोख जप्त!
बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने 15 सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत कर्नाटकातील 68 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी सुरू होती.
बेंगळुरूः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau raid) छाप्यात कर्नाटकातील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरातून बरीच मालमत्ता जप्त करण्यात आली. छाप्यादरम्यान एका अधिकाऱ्याच्या घरातून 7 किलो सोने जप्त करण्यात आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कृषी विभागाचे सहसंचालक रुद्रेशप्पा टी एस यांच्या अवैध संपत्तीची माहिती मिळाली होती, त्यानंतर हा छापा टाकण्यात आला, ज्या दरम्यान या अमाप संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. छाप्यामध्ये 15 लाखांची रोकड रक्कमही जप्त करण्यात आली. रुद्रेशप्पा टीएस व्यतिरिक्त इतर अनेक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर एसीबीचे छापे बुधवारी पडले.
Bengaluru | Over a hundred Anti-Corruption Bureau (ACB) officials conducted search operations at 68 locations with respect to disproportionate of assets cases registered against 15 officers: Anti-Corruption Bureau (ACB) pic.twitter.com/Z2V3Pu3EQk
— ANI (@ANI) November 24, 2021
बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने 15 सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत कर्नाटकातील 68 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी सुरू होती. बेंगळुरू येथील बंगळुरू विकास प्राधिकरणाच्या (BDA) मुख्यालयात आणि इतर कार्यालयांवर सुरू असलेल्या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले. मंगळुरू, बेंगळुरू, मंड्या आणि काही जिल्ह्यांमध्ये 15 सरकारी अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा घरी एसीबीच्या पथकांनी छापे टाकले. या पथकात आठ एसपी, 100 अधिकारी आणि 300 एसीबी कर्मचारी होते. एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाचा भाग म्हणून रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
एसीबीने ज्यांचावर छापे टाकले त्या अधिकाऱ्यांमध्ये के.एस. लिंगगौडा, कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी, मंगळुरू; श्रीनिवास के. कार्यकारी अभियंता, HLBC, मंड्या; टी. एस. रुद्रेशप्पा, सहसंचालक, गदग कृषी विभाग; सावदट्टीचे सहकार विकास अधिकारी ए.के. मस्ती; सदाशिव मरलिंगण्णावर, वरिष्ठ मोटार निरीक्षक, गोकाक; बेळगाव येथील हेस्कॉममधील ‘क’ श्रेणीचे कर्मचारी नाथाजी हिराजी पाटील; एस. एम. बिरादार, कनिष्ठ अभियंता, पीडब्ल्यूडी आणि के. एस. शिवानंद, निवृत्त उपनिबंधक; बल्लारी यांचा समावेश होता.
इतर बातम्या