Chhattisgad Crime : छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, मोबाईलवरील व्हिडिओ पाहून केले कृत्य

पीडित मुलीच्या मोठ्या भावाला सर्वात आधी या गैरकृत्याबाबत संशय आला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराला वाचा फुटली. मुलीच्या मोठ्या भावाने शेजारील मुले त्याच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित घटनेच्या संशयातून त्याने कुटुंबीयांना अलर्ट केले.

Chhattisgad Crime : छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, मोबाईलवरील व्हिडिओ पाहून केले कृत्य
छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 1:34 AM

छत्तीसगड : छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे एका 7 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलांनी(Minor Boys) सामूहिक बलात्कार(Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या मुलांनी मोबाईलवर व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. मुलांनी गेम खेळतानाच 7 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (7-year-old girl gang-raped by minors in Chhattisgarh)

दीड महिन्यांपासून सामूहिक बलात्काराचा प्रकार

एकाच कुटुंबातील 7 ते 13 वर्षे वयोगटातील 6 मुले मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहून मागील दीड महिन्यांपासून पीडित मुलीचे लैगिक शोषण करीत होते. याचदरम्यान मुलीची प्रकृती खालावली आणि तिच्या पोटात दुखू लागले होते. या धक्कादायक प्रकाराबाबत घरातील कोणालाच काही कल्पना नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीडित मुलीच्या भावाला आला संशय आणि अत्याचाराला वाचा फुटली

पीडित मुलीच्या मोठ्या भावाला सर्वात आधी या गैरकृत्याबाबत संशय आला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराला वाचा फुटली. मुलीच्या मोठ्या भावाने शेजारील मुले त्याच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित घटनेच्या संशयातून त्याने कुटुंबीयांना अलर्ट केले. कुटुंबीयांनी आरोपी मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी बलात्कार केल्याची बाब कबूल केली. त्यानंतर पीडित मुलीला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि ही घटना पोलिसांनाही कळवण्यात आली.

दोन ते तीन महिन्यांपूर्वीची घटना उघडकीस

सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सामूहिक बलात्काराचा प्रकार 7 ते 13 वयोगटातील मुलांनी केल्याचे पाहून सर्वजण चक्रावून गेले आहेत. हा सगळा मोबाईलवरील व्हिडिओचा दुष्परिणाम असल्याने पालकवर्ग हादरून गेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपासाची चक्रे फिरवली आहेत. ही घटना दोन ते तीन महिन्यांपूर्वीची असल्याचे उघडकीस आले आहे. मोबाईलमधील व्हिडिओ पाहून लैगिक शोषणाचा गैरप्रकार शिकल्याचे मुलांनीच चौकशीत कबूल केले आहे. मुले मोबाईलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहत होती, याचाही तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने लहान मुलांच्या मोबाईल वापराबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. (7-year-old girl gang-raped by minors in Chhattisgarh)

इतर बातम्या

Nanded Suicide : नांदेडमध्ये दुहेरी आत्महत्या, कौटुंबिक कारणातून गळफास घेत दोन महिलांनी जीवन संपवले

खुलेआम दहशत माजवण्याचा प्रकार, रहिवाशावर जीवघेणा हल्ला! घणसोलीत काय चाललंय काय?

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.