Biparjoy Cyclone : बिपरजॉय दरम्यान गुजरातमध्ये किती मुलांचा झाला जन्म

Biparjoy Cyclone and Gujarat : गुजरातमधील बिपरजॉय चक्रीवादळ गेले. परंतु या वादळाने आपल्या मागे पाऊलखुणा कायम ठेवल्या. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Biparjoy Cyclone : बिपरजॉय दरम्यान गुजरातमध्ये किती मुलांचा झाला जन्म
cyclone rain
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 12:17 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये गुरुवारी धडकले. त्यानंतर ते शुक्रवारी कमकुवत होत राजस्थानकडे गेले. या चक्रीवादळामुळे गुजरातमधील आठ जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकांचे स्थालांतर करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष ऑपरेशन राबवले गेले. या चक्रीवादळामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. परंतु सरकारने केलेल्या उपाययोजनामुळे जिवीत हानी झाली नाही. यासाठी ओडिशा मॉडलचा वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले होते.

किती मुलांचा झाला जन्म

चक्री वादळाच्या 72 तास आधी गुजरात सरकारने 8 अतिजोखमीच्या जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख लोकांचे स्थालांतर केले होते. त्यांना कॅम्पमध्ये पाठवले होते. त्यात 1 हजार 152 गर्भवती महिला होत्या. त्यापैकी 707 महिलांनी चक्रीवादळ दरम्यान मुलांना जन्म दिला. महिलांच्या प्रसूतीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी 302 सरकारी वाहने आणि 202 रुग्णवाहिका तैनात ठेवल्या होत्या. या रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय कर्मचारीही होते.

हे सुद्धा वाचा

काय केल्या उपाययोजना

  • 13 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी 6 जिल्ह्यांतील 65 लाख लोकांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज पाठवला होता.
  • गर्भवती महिलांची त्यांच्या प्रसूतीच्या तारखेनुसार यादी तयार करण्यात आली आणि 1,152 वैद्यकीय सेवा केंद्राकडे पाठवण्यात आली.
  • सिंह आणि वन्यप्राण्यांच्या बचावासाठी 210 पथके तैनात करण्यात आली होती.
  • गुजरातमध्ये 1 लाख 8 हजार लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले असून त्यात 11 हजार मुले आणि 5 हजार वृद्धांचा समावेश आहे.
  • तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या 50 लोकांना वाचवले असून त्यांना ओखा केंद्रात ठेवले आहे. 21 हजार बोटी किनाऱ्यावर थांबवण्यात आल्या आहेत.
  • एनडीआरएफच्या 19 तुकड्या, एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मदतकार्यात गुंतलेल्या गुजरात पोलिस कर्मचाऱ्यांना सॅटेलाइट फोन देण्यात आले.

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस

गुजरातमधून पुढे बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानमध्ये गेले. यादरम्यान अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. आता शनिवारीही त्याचा प्रभाव ओसरणार आहे तरी पूर्व राजस्थान, लगतच्या हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडू शकतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.