Surat Baby Beatened : मोलकरणीकडून 8 महिन्यांच्या मुलाला दीड तास अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

पटेल जोडपे कामाला गेले की त्यांच्या घरातून मुलांच्या रडण्याचा आवाज येतो अशी माहिती पटेल यांच्या शेजारणीने त्यांना दिली. यानंतर मुलांना सांभाळणाऱ्या बाईवर लक्ष ठेवण्यासाठी पटेल यांनी दोन दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे लावले. यामुळे मोलकरणीचा कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला.

Surat Baby Beatened : मोलकरणीकडून 8 महिन्यांच्या मुलाला दीड तास अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 8:16 PM

सूरत : एका आठ महिन्यांच्या मुलाला मोलकरणीने दीड तास अमानुष मारहाण(Beatened) केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरत शहरात घडली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाली असून मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोलकरणी(Maid)ने केलेली लज्जास्पद घटना घरातील सीसीटीव्ही(CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मोलकरणीला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मुलाच्या पालकांनी दोन दिवसांपूर्वीच घरात सीसीटीव्ही लावले होते. यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. मितेश पटेल हे आपली पत्नी आणि जुळ्या मुलांसह सूरत शहरात राहतात. पटेल पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यामुळे त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना दिवसभर सांभाळण्यासाठी एक बाई घरी ठेवली होती. ही महिला सप्टेंबर 2021 पासून पटेल यांच्याकडे काम करीत आहे. (8-month-old boy beaten by maid for one and half hours in surat, incident captured on CCTV)

कधी मांडीवर बसवून तर कधी बेडवर आपटत मुलाला मारहाण

पटेल जोडपे कामाला गेले की त्यांच्या घरातून मुलांच्या रडण्याचा आवाज येतो अशी माहिती पटेल यांच्या शेजारणीने त्यांना दिली. यानंतर मुलांना सांभाळणाऱ्या बाईवर लक्ष ठेवण्यासाठी पटेल यांनी दोन दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे लावले. यामुळे मोलकरणीचा कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला. मुलाच्या मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये सदर महिला मुलाला मांडीवर बसवून मारहाण करीत आहेत तर कधी कधी बेडवर आपटताना दिसत आहे. महिला दीड तास मुलाला मारहाण करीत होती. या मारहाणीमुळे मुलाला ब्रेन हॅमरेज झाला असून मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सीसीटीव्हीमध्ये महिला कशावरुन तरी नाराज होती आणि त्याचा राग ती या मुलावर काढत होती, असे जी-विभाग एसीपी झेड आर देसाई यांनी सांगितले. आरोपी महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिला ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु महिलेच्या कोविड-19 चाचणीचा अहवाल येताच तिला औपचारिकपणे अटक केली जाईल.

औरंगाबादमध्ये वृद्धाला मारहाण

शेतजमिनीच्या वादातून औरंगाबादमध्ये बिलोनी गावात दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका वृद्धालाही अमानुष मारहण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती पाठमोरा बसला आहे. त्याने आपला झब्बा वर केला आहे आणि त्याच्यावर दगडफेक आणि काठीने मारहाण सुरु आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत एक मुलगी या वृद्धाला मारहाण करण्यापासून अडवताना दिसत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. (8-month-old boy beaten by maid for one and half hours in surat, incident captured on CCTV)

इतर बातम्या

Dombivali Crime : डोंबिवलीत 24 कोटींचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न, टोळी गजाआड, आतापर्यंत 10 कोटींचा गंडा

Pune Crime | सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! आंबेगावमध्ये ऊसाने भरलेली ट्राली अंगावर कोसळल्याने जागीच मृत्यू

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.