अबब.. वय फक्त 12 वर्षे, मात्र जेवताना तब्बल 40 चपात्या खातो, कारण काय?
एखाद्या 12 वर्षाच्या मुलाचा आहार किती असेल असं कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? 2, 3, 4 चपात्या? यापुढे सांगताना तर कुणीही विचार करेल. मात्र, मध्य प्रदेशमध्ये एक 12 वर्षांचा मुलगा जेवणात तब्बल 40 चपात्या खातोय.
भोपाळ : एखाद्या 12 वर्षाच्या मुलाचा आहार किती असेल असं कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? 2, 3, 4 चपात्या? यापुढे सांगताना तर कुणीही विचार करेल. मात्र, मध्य प्रदेशमध्ये एक 12 वर्षांचा मुलगा जेवणात तब्बल 40 चपात्या खातोय. हे ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. यामागे कारणंही तसंच आहे. शिवपुरी जिल्ह्यातील या मुलाचं नाव संदिप असं आहे. संदिपने 40 चपात्या खाल्ल्या त्यानंतरही त्याच्या घरच्यांनी त्याकडे फार गांभीर्याने पाहिलं नाही. मात्र, काही दिवसांनी त्याच्या एका डोळ्याची दृष्टीच गेली आणि मग त्याचे घरचे त्याला दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी जे कारण सांगितलं ते ऐकून घरचे अवाक झाले.
40 चपात्या खाणाऱ्या संदिपची तपासणी केली असता डॉक्टरांना 1206 एमजी सुगर लेव्हल आढळली आणि डॉक्टरही चक्रावले. शरीरातील साखरेचं प्रमाण खूप अधिक असल्यानंच तो 40 चपात्या खात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर तपासणी करत असतानाच संदिपचं डोकं भयान दुखू लागलं. त्यानंतर संदिप केवळ श्वास घेत होता, मात्र त्याची हालचाल बंद झाली. ह्रदयासह त्याचं शरीराने काम करणं बंद केलं.
डोक्यात पू तयार झाल्यानं दृष्टीही गेली
तपासणीत संदिपच्या डोक्यात पू तयार झाल्याचं समोर आलं. यानंतर डॉक्टरांनी डोक्यावर शस्त्रक्रिया करुन तब्बल 720 मिलीलीटर पू बाहेर काढला. डोक्यात पू तयार झाल्यानंच त्याची दृष्टी गेली होती. डॉक्टरांनी संदिपची साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी त्याला इंसुलिनचे 6 युनिट दिले. यानंतर संदिपची साखर पातळी सामान्य होऊन त्याला शुद्ध आली. डॉक्टरांनी त्याची डोळ्यांची तपासणी केली आणि तातडीने नेत्रशस्त्रक्रिया करण्यास सांगितले. पालकांनीही तातडीने तयारी दर्शवली. त्यामुळे संदिपच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याची दृष्टी पूर्ववत झाली.
हेही वाचा :
Health Tips : साखर खाण्याची सवय सोडण्यासाठी ‘या’ टिप्स उपयोगात आणा; वेगाने वजन घटणार!
मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
Brown Sugar Vs White Sugar : ब्राऊन शुगर की व्हाईट शुगर? आपल्यासाठी कोणती चांगली, वाचा…
व्हिडीओ पाहा :
A Boy of 12 year old eats 40 chapatis a day in Madhya Pradesh know why