BSF Jawan Firing : पंजाबपाठोपाठ बंगालमध्येही बीएसएफ जवानाचा गोळीबार; सहकार्‍यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरापासून सुमारे 230 किमी अंतरावर असलेल्या निमलष्करी दलाच्या बेरहामपूर सेक्टरअंतर्गत बीएसएफचा कॅम्प आहे. याच कॅम्पमध्ये गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, दोन जवानांना स्थानिक पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली होती.

BSF Jawan Firing : पंजाबपाठोपाठ बंगालमध्येही बीएसएफ जवानाचा गोळीबार; सहकार्‍यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 10:09 PM

नवी दिल्ली : पंजाबच्या अमृतसरमध्ये सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) 144 व्या बटालियन मुख्यालयात रविवारी एका जवानाने चार सहकार्‍यावर गोळ्या झाडून (Firing) आत्महत्या (Suicide) केली. ही घटना ताजी असतानाच सोमवारी पश्चिम बंगालमध्ये बीएसएफ जवानांसंबंधी आणखी एक धक्कादायक घटना घडली. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका छावणीत सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आपल्या सहकार्‍यावर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बीएसएफमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. (A BSF jawan opened fire on a colleague and shot himself in bengal)

संबंधित अधिकार्‍याने सांगितले की, ही घटना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळील ककमरीचार सीमा सुरक्षा बल कॅम्पमध्ये सोमवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास वाजता घडली. सकाळी-सकाळीच गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात प्रचंड खळबळ उडाली. त्यानंतर हा गोळीबार बीएसएफच्याच जवानाने केल्याचे उघड झाल्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोघेही बीएसएफच्या 117 व्या बटालियनचे जवान

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरापासून सुमारे 230 किमी अंतरावर असलेल्या निमलष्करी दलाच्या बेरहामपूर सेक्टरअंतर्गत बीएसएफचा कॅम्प आहे. याच कॅम्पमध्ये गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, दोन जवानांना स्थानिक पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. त्याच वादाचे पुढे गोळीबारात रुपांतर झाले. पंजाबमधील अमृतसर येथील एका छावणीत झालेल्या गोळीबारामध्ये बीएसएफचे पाच जवानांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच बंगालमध्ये बीएसएफ कॅम्पमध्ये गोळीबाराची घटना घडली. हेडकॉन्स्टेबल जॉन्सन टोप्पो याने त्याचा सहकारी हेड कॉन्स्टेबल एसजी शेखर यांच्यावर सर्व्हिस रायफलने गोळ्या झाडल्याचा आरोप अधिकार्‍यांनी केला आहे. ते दोघेही बीएसएफच्या 117 व्या बटालियनचे जवान असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश

सीमेवरील नाईट ड्युटी संपवून ते आपल्या पोस्टवर परतत असताना ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण गेल्या वर्षी सीमेवर एका शेतकर्‍याला कथितपणे ताब्यात घेण्याशी संबंधित आहे. बीएसएफने या घटनेचे कारण शोधण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बीएसएफ आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (A BSF jawan opened fire on a colleague and shot himself in bengal)

इतर बातम्या

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत

Supreme Court : बनावट प्रमाणपत्रे बनवून कोरोना मृत्यूची भरपाई लाटली जातेय; सुप्रीम कोर्टाने दिला कारवाईचा इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.