मुस्लीम फेरीवाल्यांकडून सामान घेतले तर 5100 रुपयांचा दंड, गुजरातमधील ग्राम पंचायतीचे फर्मान व्हायरल
बनासकाठा येथील वाघासन समुहाच्या एका ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर, मुस्लिमांकडून वस्तू घेणाऱ्यांना 5100 रुपयांचा दंड करण्यात येईल, असे लिहिण्यात आले आहे. यात वाघासन गावातील दुकानदारांनी, उदयपूर हत्याकांडाचा प्रकार पाहता मुस्लीम समुदायाच्या फेरीवाल्यांकडून सामान खरेदी करु नये, असे आदेशच देण्यात आले आहेत.
बनासकाठा, गुजरात – जर मुस्लीम फेरीवाल्यांकडून (Muslim hawkers) सामान विकत घेतले तर 5100 रुपयांचा दंड (fine)आकारण्यात येईल असे फर्मान बनासकाठाच्या एका ग्राम पंचायतीने काढले आहे. हे पत्र सध्या व्हायरल होते आहे. पोलिसांनी हे पत्र निराधार असल्याचे सांगत याचे पालन कुणीही करु नये, असे आवाहनही केले आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेतही दिले आहेत. उदयपूरमधील (Udaypur murder)कन्हैय्या हत्याकांडानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापू्र्वीही कर्नाटकात हिजाब प्रकरणानंतर असा वाद उफाळला होता. कर्नाटकातही अशा प्रकारचे कॅम्पेन काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मंदिर परिसरात असलेली मुसलमान व्यक्तींची दुकाने बंद करण्याची मागणीही करण्यात आली होती. या दुकानांतून वस्तू घेऊ नका असे आवाहन करण्यात आले होते. त्यावरुन वाद उफाळला होता.
An alleged gram panchayat notification bearing the name of the Sarpanch directing shopkeepers and residents not to buy anything from Muslim vendors is doing the rounds at a village in #Gujarat‘s Banaskantha district. pic.twitter.com/gWKPIuFC3Z
हे सुद्धा वाचा— Atulkrishan (@iAtulKrishan) July 2, 2022
बनासकाठातील एका ग्रामपंचायतीचे लेटरपॅड व्हायरल
या बाबतच्या वृत्तानुसार बनासकाठा येथील वाघासन समुहाच्या एका ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर, मुस्लिमांकडून वस्तू घेणाऱ्यांना 5100 रुपयांचा दंड करण्यात येईल, असे लिहिण्यात आले आहे. यात वाघासन गावातील दुकानदारांनी, उदयपूर हत्याकांडाचा प्रकार पाहता मुस्लीम समुदायाच्या फेरीवाल्यांकडून सामान खरेदी करु नये, असे आदेशच देण्यात आले आहेत. याबाबत माजी सरपंचांची सही असून त्यांचा स्टँपही मारण्यात आलेला आहे.
काय लिहिले आहे पत्रात
जर कुणा दुकानदाराला मुस्लीम व्यापाऱ्यांकडून सामान घेताना पाहण्यात आले तर त्यांना 5100 रुपये दंड करण्यात येईल. आणि ते पैसे गोशाळेला देण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहेत. हे पत्र व्हायरल व्हायला लागल्यानंतर, प्रशासनाने यादी दखल घेतली आहे. हे व्हायरल होत असलेले पत्र अधिकृत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या लेटर पॅडवर असलेले हस्ताक्षर आणि स्वाक्षरी ही अधिकारी व्यक्ती नसलेल्याची आहे. त्यांना असे आदेश देण्याचे अधिकारच नाहीत. सरपंचपद रिक्त असल्याचेही सांगण्यात आले आहे. अजून ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत सध्या प्रशासकाच्या ताब्यात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उदयपूर हत्याकांडानंतर तीव्र पडसाद
28 जून रोजी राजस्थानात उदयपूरमध्ये मुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिणाऱ्या टेलर कन्हैय्यालाल यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. त्याचा एक व्हिडिओही या हल्लेखोरांनी जारी केला. इस्मालच्या झालेल्या अपमानाचा हा बदला असल्याचे त्यात सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटकही केलेली आहे.