Racket Burst: चालत्या फिरत्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एक कॉल, गाडीत मुली आणि..

या अटक करण्यात आलेल्या महिला पलवल, दिल्ली, कानपूर आणि राजस्थान, जयपूरच्या राहणाऱ्या आहेत. क्राईम ब्रांचच्या टीमने स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली. पोलिसांमधील मुख्य शिपाई जवाहर याने आरोपी महिलेशी फोनवरुन संवाद साधला होता. आरोपी महिलेने मुली नेण्यासाठी 10 मिनिटांत एका हॉटेलजवळ येण्यास सांगितले होते.

Racket Burst: चालत्या फिरत्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एक कॉल, गाडीत मुली आणि..
रॅकेटचा पर्दाफाशImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 5:08 PM

फरीदाबाद – एका कॉलवर (one call)मुलींचा पुरवठा करणाऱ्या 5जणांच्या टोळीला (5 members gang)पोलिसांनी अटक केली आहे. काही जण कारमध्ये हे सेक्स रॅकेट (racket in car)चालवत असल्याची मामिहीत पोलिसांना मिळाली होती. कारमध्ये हा सगळा कारभार होत असल्याचे त्यांचा असा काही ठोस पत्ता लागत नव्हता. पैसे घेून ते कोणत्ही हॉटेलमध्ये जात असत. हे आरोपी मुलांनाही कारमधून फोनवरच संपर्क करीत होते. आता यांना पकडायचे कसे असा प्रश्न पोलिसांसमोर होता. अखेर पोलिसांनी कस्टमर्स म्हणून या आरोपींना कॉल केला. कॉलवर पोलिसांची एका तरुणाशी चर्चा झाली. त्या आरोपीने पोलिसांना कस्टमर्स समजून काही फोटो पाठवले आणि मुलीची निवड करण्यासाठी सांगितले. त्यानंतर आरोपी महिला तीन तरुणींला सोबत घेऊन कारमधून आली. पोलिसाने कस्टमर म्हणून तिला पैसेही दिले, त्यानंतर इशारा मिळताच पोलिसांच्या टीमने या सगळ्यांना अटक केली.

नेमका कसा करत होते मुलींचा पुरवठा

या अटक करण्यात आलेल्या महिला पलवल, दिल्ली, कानपूर आणि राजस्थान, जयपूरच्या राहणाऱ्या आहेत. क्राईम ब्रांचच्या टीमने स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली. पोलिसांमधील मुख्य शिपाई जवाहर याने आरोपी महिलेशी फोनवरुन संवाद साधला होता. आरोपी महिलेने मुली नेण्यासाठी 10 मिनिटांत एका हॉटेलजवळ येण्यास सांगितले होते. हा पोलीस शिपाई साध्या कपड्यात होता. तो हॉटेलजवळ पोहचल्यानंतर तिथे काही वेळआतच एक कार येऊन थांबली. त्यात बसलेल्या व्यक्तीने फोन करुन या पोलीस शिपायाला जवळ बोलावले आणि सहा हजार रुपये देण्यास सांगितले.

5 महिन्यांपासून करत होते हेच काम

या शिपायाने दोन हजारांच्या तीन नोटा समोर बसलेल्या महिलेकडे दिले. महिलेने 2 हजार रुपये ड्रायव्हरला दिले आणि 4 हजार रुपये स्वताकडे ठेवले. त्याचवेळी या शिपायाने टीमला इशाऱ्याने बोलावले. त्यानंतर कारमधून एक ड्रायव्हर आणि 4 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात वेश्याव्यवसाय करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी गेल्या 5 महिन्यांपासून हाच उद्योग करीत होते, असेही समोर आले आहे. हे आरोपी ग्राहकांशी फोनवर संपर्कात असल्याची माहितीही समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

गुन्हे करण्याच्या पद्धतीत बदल

अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींमध्ये नवनव्या कल्पना काढून गुन्हे करण्याची वृत्ती बळावताना दिसते आहे. सेक्स रॅकेट चालवताना कोणत्याही जागेचा वापर न करता, कारमधूनच सेक्स रॅकेट चालवण्याची ही कल्पना तशीच नाविन्यपूर्ण म्हणावी लागेल. मात्र पोलिसांनी चलाखपणे याला मात देत या सगळ्या टोळीचाच पर्दाफाश केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.