Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक असं गाव की जिथे हिंदू ठेवतात मुसलमान अडनाव, 5 हजार लोकसंख्येच्या गावातील सगळ्यांचे अडनाव ‘गिलानी’, स्थानिक म्हणतात..

जुनी पिढी आपल्या जातीच्या अडनावाचा उल्लेख केल्यानंतर गिलानी लावत असत. आता नव्या पिढीने जातींचे अडनाव हटवून थेट गिलानी असे अडनाव लावण्यास सुरुवात केली आहे.

एक असं गाव की जिथे हिंदू ठेवतात मुसलमान अडनाव, 5 हजार लोकसंख्येच्या गावातील सगळ्यांचे अडनाव 'गिलानी', स्थानिक म्हणतात..
one village one surnameImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:29 PM

नालंदा – सध्या देशात मंदिर आणि मशिदीवरुन वाद होत असले, हिंदू आणि मुस्लीम बांधवात तणावाची स्थिती पाहायला मिळत असली, तरी हिंदू-मुस्लीम एकतेची अनेक उदाहरणेही देशात आहेत. असचं एक उदाहरण म्हणजे बिहारमध्ये असलेलं एक गाव. या गावात राहणारा हिंदू असो वा मुस्लीम, जन्माला येणारा कुठल्याही घरात जन्माला आला तरी त्यांच्या नावाच्या शेवटी एकच अडनाव लागते. तेही अडनाव आहे मुस्लीम. नालंदा जिल्ह्यातील या गावाचं नाव आहे गिलानी. गावाचं नाव आपलं अडनाव म्हणून लावायची इथली परंपरा आहे. पिढीजात असलेली ही परंपरा आजही गावकरी निष्ठेने पुढे चालवित आहेत. आता तर गावातील तरुणवर्गही गावाचे नाव आपल्या नासोबत जोडण्याचा अभिमान व्यक्त करताना पाहायला मिळतो. या स्थानिकांचं त्यांच्या गावावर आणि मातीवर प्रेम आहे. अनेक जण असेही आहेत की ज्यांनी गाव सोडून शहरात नोकरीनिमित्ताने स्थायिक झाले आहेत, मात्र तरीही या परंपरेतून त्यांनी आपले गाव मनातून आणि नावातून सोडलेले नाही.

गावाच्या नावावरुनच बाहेर ओळख

त्यांनी नाव सांगितले की त्यांच्या नावावरुनच ते कुठले रहिवासी आहेत, याची ओळख बाहेरच्या प्रदेशात होते. गिलानी गावातील प्रत्येक गावकऱ्याच्या नावापुढे त्यांच्या गावाचे नाव अडनाव म्हणून लावले जाते. त्याचप्रमाणे या भागात असलेल्या इतर गावातील अडनावेही आहेत. अस्थावाचा रहिवासी अस्थानवी, हरगावांचा राहमारा हरगानवी, डुमरावाचा राहाणारा डुमरावनी, उगावांचा रहिवासी उगावनी, चकदीनचा रहिवासी चकदीनवी आणि देसना गावातील रहिवासी देसनवी असे अडनाव लावतात.

गिलानी गावाचं हे वेगळं वैशिष्ठ्य

या सगळ्या गावांमध्ये गिलानी हे गाव खास आहे. इतर सहा गावांमध्ये गावाचे अडनाव लावण्याची परंपरा केवळ मुस्लीम धर्मीयच पाळतात. मात्र या गिलानी गावात हिंदू, मुसलमान हे दोव्ही समुदायाचे रहिवासी ही परंपरा निभवत आहेत. गावातील एका वृद्ध व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुघलकाळापासून ही परंपरा आहे. इस्लामचे अनुयायी हजरत अबदुल कादिर जिलानी यांच्या नावाने गिलानी हे गावाचे नाव ठेवण्यात आले, असे मानण्यात येते. अरबी भाषेत ग हा शब्द नाही, त्यामुळे लोकं त्यांना जिलानी असे म्हणतात. या सगळ्या कारणाने या गावाचे पूर्ण नाव आहे, मोहीउद्दीनपूर गिलानी.

हे सुद्धा वाचा

एका पुस्तकातही आहे उल्लेख

मौलाना मुज्जफर गिलानी यांचे पुस्तक मजमीनच्या नुसार, गिलानी हे एका जागेचे नाव होते. ज्या ठिकाणी मोठे पीरबाबा यांचे एक अनुयायी राहत असत. काही कारमामुळे यातील काही जण मोहीउद्दीनपूर गिलानीत आले. या आलेल्या नागरिकांचे अडनावह गिलानीच होते. या ठिकाणी आलेल्या या सगळ्यांचे सौहार्द आणि त्यांचा प्रभाव पडल्याने गावातील अनेकांनी आपले अडनाव हे गावाचे नाव म्हणजेच गिलानी असे लावण्यास सुरुवात केली.

5 हजार लोकवस्तीचे गाव, सुमारे अर्धा डझन जाती

गिलानी गावाची लोकसंख्या आहे 5 हजार, इथे मुस्लीम घर्मियांसोबतच हिंदू धर्मातील पासवान, यादव, न्हावी, रविदास, कुंभार, पंडित या जातींचे लोक राहतात. हिंदू असो वा मुस्लीम प्रत्येकजण आपले अडनाव म्हणून गिलानी हे गावाचे नाव लावतो. जुन्या पीढीपासून नव्या पीढीपर्यंत सगळेच जण याचे अनुकरण करतात.

असाही झालाय बदल

जुनी पिढी आपल्या जातीच्या अडनावाचा उल्लेख केल्यानंतर गिलानी लावत असत. आता नव्या पिढीने जातींचे अडनाव हटवून थेट गिलानी असे अडनाव लावण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ अनिल गिलानी, इमरान गिलानी, अभिषेक गिलानी अशा नावांची लोकं या गावात राहतात.

बुद्धिवंतांचं गाव अशी ओळख

हे गाव खूप जुने असल्याचे इथली मंडळी सांगतात. या गावाची ओळख अनेक विद्वानांचे, साहित्यकारांचे, आयएएस, इंजिनिअरांचे गाव अशी आहे. इथले अनेक जण परदेशातही जाऊन स्थायीक झालेले आहेत. इथे राहणारे मौलाना मनाजिर अहसन गिलानी यांची १४ पुस्तके जगभरात नावाजली गेली आहेत. आंब्यांसाठीही हे गाव चांगले प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.