महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?

पती चारित्र्यावर संशय घेत असे व वारंवार जीवे मारण्याची धमकीही देत असे. त्यामुळेच आपण प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढला असे महिलेने पोलिसांना सांगितले. ज्या गाडीतून पतीचा मृतदेह आणण्यात आला ही गाडीही आशिष पांडेची आहे.

महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?
महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 7:43 PM

भोपाळ : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढला. आधी पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या मग प्रियकराच्या मदतीने डोक्यात वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर आधी पत्नी आणि तिचा प्रियकर विल्हेवाट मृतदेह गाडीत टाकून फिरत राहिले. मात्र कधी ना कधी पकडले जाणार हे माहित असल्याने दोघेही मृतदेह घेऊन पोलिसांना शरण गेले.

मंगळवारी दुपारी एक महिला कटारा हिस्ल पोलीस ठाण्यात दाखल झाली. आपण आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. तसेच पतीचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये असल्याचे महिला म्हणाली. महिलेचे बोलणे ऐकून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी गाडीची डिक्की उघडून पाहिली असता खरोखर डिक्कीत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी तात्काळ महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली

संगीता असे सदर महिलेचे नाव आहे तर आशिष पांडे असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. चौकशीत महिलेने पती हत्या कशी व का केली याची माहिती दिली. सदर महिला कटारा हिल्स येथे आपला पती व मुलांसह राहते. तर तिचा प्रियकर आशिष पांडे हा तिच्या शेजारी राहतो. पती चारित्र्यावर संशय घेत असे व वारंवार जीवे मारण्याची धमकीही देत असे. त्यामुळेच आपण प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढला असे महिलेने पोलिसांना सांगितले. ज्या गाडीतून पतीचा मृतदेह आणण्यात आला ही गाडीही आशिष पांडेची आहे.

अतिरिक्त एसपी राजेश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष पांडे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. शेजारी राहत असल्यामुळे महिलेची पांडेसोबत ओळख झाली. या ओळखीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. महिलेच्या पतीने एक दिवस दोघांनाही रंगेहाथ पकडले होते. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यामुळे संगीता आणि तिचा प्रियकर आशिष यांनी संगीताचा पती धनराज मीनाला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला.

कशी केली हत्या ?

घटनेच्या रात्री आरोपी पत्नी संगीता हिने पतीला काढा प्यायला दिला. या काढ्यात तिने झोपेच्या 10 गोळ्या टाकल्या होत्या. झोपेच्या गोळ्यांमुळे धनराजला गाढ झोप लागली. यानंतर संगीताने तिचा प्रियकर आशिष याला घरात बोलावून लोखंडी रॉडने धनराजच्या डोक्यात अनेक वार करून त्याचा खून केला. यानंतर दोघेही मृतदेह आशिषच्या गाडीत ठेवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आज नाही तर उद्या पोलीस पकडतील, असे वाटल्याने त्यांनी स्वत:हून पोलिसांसमोर शरणागती पत्करली. (a woman killed her husband with the help of her boyfriend in Madhya Pradesh)

इतर बातम्या

मेरी बहन को मारा म्हणत चाकूनेच भोसकलं, औरंगाबादमधील कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर गंभीर जखमी!

धक्कादायक ! साताऱ्यात पाच वर्षाच्या मुलाची अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, अल्पवयीन आरोपी अटकेत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.