UP Murder : उत्तर प्रदेशात नात्याला काळिमा फासणारी घटना, संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकले
साजिदच्या आजोबांची सुमारे दोन कोटींची मालमत्ता आहे. शहजाद, जावेद आणि नौशाद या तिघांची वागणूक चांगली नसल्याने आजोबांनी आपल्या नातू म्हणजेच साजिद आणि त्याच्या भावांच्या नावे सर्व संपत्ती केली होती. यामुळेच साजिदच्या काकांचे त्याच्या वडिलांशी वाद होत होते. साजिद आणि इतर चार भाऊ रद्दीचा व्यवसाय करतात.
उत्तर प्रदेश : संपत्तीच्या वादातून सख्या काकांनीच मिळून तरुण (Youth) पुतण्याची 11 वेळा भोसकून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 2 वाजता उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. संपत्तीवरुन मोठ्या भावासोबत असलेल्या वादातून तिघा भावांनी मिळून पुतण्याला ठार केले. साजिद असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शहजाद, जावेद आणि नौशाद अशी हत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत. ही सर्व हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मेरठच्या ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आतापर्यंत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी पूर्वनियोजित कट करुनच साजिदचा काटा काढला. (A youth killed by his uncle in a property dispute in Uttar Pradesh)
काय आहे नेमकी घटना ?
सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान सुरु आहे. रमजान निमित्त मशिदीत नमाज अदा करुन साजिद आपल्या घरी परतत होता. जसा तो मशिदीतून बाहेर पडला, तसे आधीच दबा धरुन बसलेले त्याचे तिनही काका त्याच्याकडे धावले आणि त्याला जमिनीवर पाडले. एक काका नौशादने साजिदचे पाय धरले तर दुसरा काका जावेदने त्याचे हात धरले. यानंतर तिसरा काका शहजादने साजिदवर चाकूने अमानुष वार करण्यास सुरुवात केली. हल्ला करणाऱ्या काकांनी आधी साजिदच्या पोटावर, छातीवर आणि इतरत्र 8 वार केले आणि कमरेवर एक वार केला. सुमारे 5 मिनिटे चाललेल्या या हल्ल्यात साजिद जखमी झाला आणि आक्रोश करू लागला.
यानंतर तीनही हल्लेखोर वेगवेगळ्या दिशेने पळाले. यानंतरही तरुणाचा श्वासोच्छवास सुरू होता आणि तो उठून बसला. त्यानंतर पुन्हा एकदा हल्लेखोर शहजाद परत आला आणि त्याने जखमी साजिदचा चाकूने गळा चिरला. या शेवटच्या आणि 11व्या हल्ल्यात साजिद जवळजवळ मृतावस्थेत पोहोचला होता. यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
संपत्तीच्या वादातून घडले हत्याकांड
साजिदच्या आजोबांची सुमारे दोन कोटींची मालमत्ता आहे. शहजाद, जावेद आणि नौशाद या तिघांची वागणूक चांगली नसल्याने आजोबांनी आपल्या नातू म्हणजेच साजिद आणि त्याच्या भावांच्या नावे सर्व संपत्ती केली होती. यामुळेच साजिदच्या काकांचे त्याच्या वडिलांशी वाद होत होते. साजिद आणि इतर चार भाऊ रद्दीचा व्यवसाय करतात. धक्कादायक म्हणजे मेरठमधील गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडली. तेथे उपस्थित सर्व लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. साजिद मदतीसाठी ओरडत होता. मात्र कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही आणि हल्लेखोरांना पकडण्याची हिंमत केली नाही. (A youth killed by his uncle in a property dispute in Uttar Pradesh)
इतर बातम्या
Yavatmal Bee Attack : यवतमाळमध्ये मधमाशांच्या हल्यात उपसरपंचाचा मृत्यू; येडशी येथील धक्कादायक घटना