Video: आणि भेट होताच भगवंत मान यांनी थेट केजरीवालांचे पाय धरले, पंजाबमधलं आपचं सरकार कसं असणार?
भगवंत मान यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांचा चरणस्पर्श केला.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या निवडणूक निकालामध्ये आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये सत्ता मिळालीय. तर, गोव्यामध्ये देखील आपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. पंजाबमध्ये (Punjab) आपनं लोकसभा खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं होतं. आपनं पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला आहे. आज भगवंत मान (Bhagwant Mann) नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी अरविंद केजरीवाल यांची भेट होताच भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांचे पाय धरले. यावेळी आपचे नेते मनीष शिसोदिया देखील उपस्थित होते. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी आज दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं.
पाहा व्हिडीओ:
#WATCH | Aam Aadmi Party CM candidate for Punjab Bhagwant Mann meets party convener Arvind Kejriwal and party leader Manish Sisodia, in Delhi pic.twitter.com/4WbTsMqPfM
— ANI (@ANI) March 11, 2022
भगवंत मान अरविंद केजरीवाल यांच्या पाया पडले
भगवंत मान यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांचा चरणस्पर्श केला. पंजाबमध्ये आपचे केवळ 20 आमदार होते. मात्र, आपने चांगली कामगिरी केल्याने पंजाबच्या मतदारांनी आपला भरभरून मतदान केलं. आपचे 92 आमदार पंजाबच्या लोकांनी निवडून दिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ 18, अकाली दल आघाडीला चार, भाजप आघाडीला दोन आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे.
अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?
भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी त्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी माझा लहान भाऊ भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. ते आज माझ्या घरी शपथविधीचं आमंत्रण देण्यासाठी आले होते. मला पूर्ण विश्वास आहे की भगवंत मान एक मुख्यमंत्री म्हणून पंजाबच्या प्रत्येक लोकांची इच्छा पूर्ण करतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
भगवंत मान यांचा 16 मार्चला शपथविधी
आपचे भगवंत मान हे येत्या 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी 13 मार्च रोजी भगवंत मान हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल ॉयांच्यासह अमृतसरमध्ये भव्य रोड शो करणार आहेत.
इतर बातम्या:
पंजाबमधल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींकडून ‘आप’चं अभिनंदन, सहकार्याचं आश्वासन