AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा तर सनातन धर्माचा अपमान, सनबर्न फेस्टिव्हलमध्ये काय घडलं?; फेस्टिव्हल वादात का?

थर्टीफर्स्ट निमित्ताने आयोजित करण्यात आलेला गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फेस्टिव्हलमध्ये देवाचा अपमान करण्यात आल्याचं सांगत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने फेस्टिव्हलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. गोव्यातील आपचे प्रमुख अमित पालेकर या मुद्द्यावरून अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

हा तर सनातन धर्माचा अपमान, सनबर्न फेस्टिव्हलमध्ये काय घडलं?; फेस्टिव्हल वादात का?
Sunburn FestivalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 06, 2024 | 6:00 PM
Share

पणजी | 6 जानेवारी 2024 : गोव्यातील सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल चांगलाच वादात सापडला आहे. सनबर्न फेस्टिव्हलवरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टाने सनबर्नच्या आयोजकांवर गुन्हा दाकल करण्याची मागणी केली आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून आयोजकांनी भगवान शंकराचा अपमान केल्याचा आरोप आप आणि काँग्रेसने केला आहे. सनबर्न फेस्टिव्हलमधून सनातन धर्माचा अपमान झाला आहे. त्यामुळे आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केली आहे.

सनबर्न उत्सव हा प्रसिद्ध नृत्य संगीत महोत्सव आहे. गोव्यात 28 डिसेंबर रोजी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर गोव्यात दणक्यात हा फेस्टिव्हल सुरू होता. 30 डिसेंबर रोजी या फेस्टिव्हलची सांगता झाली. पण या फेस्टिव्हलमधून भगवान शंकराचा अपमान करण्यात आल्याने आम आदमी पार्टी अधिकच आक्रमक झाली आहे. आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी हा मुद्दा लावून धरून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धारलं आहे.

दारू पिऊन नाचत होते

या फेस्टिव्हलमध्ये भगवान शंकराच्या प्रतिमेचा वापर करण्यात आला होता. या फोटोसमोरच लोक दारू पिऊन नृत्य करत होते. एलईडी स्क्रिनवर भगवान शंकराचा फोटो दाखवण्यायत येत होता. हा सनातन धर्माचा अपमान आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी ही घटना आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन या प्रकाराविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अमित पालेकर यांनी केली आहे.

तो प्रकारच चुकीचा

या फेस्टिव्हलमध्ये दारू दिली जात होती. त्यावेळी भगवान शंकराचा फोटो दाखवणं योग्य नव्हतं. आम्ही पोलीस महासंचालकांना घटनास्थळी बोलवून सनबर्नच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं पालेकर म्हणाले. आयोजकांनी हा प्रकार जाणूनबुजून केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांवर टीका

गोवा सरकारने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सनबर्नच्या आयोजकांचा हा गोव्यातील अखेरचा कार्यक्रम होता. राज्यातील सरकार सातत्याने चुकीच्या गोष्टींना पाठबळ देत आलं आहे. त्यामुळे गोव्याची देशभर बदनामी होत आहेत. चांगले लोक गोव्यात यायला मागत नाहीये. त्यामुळे पर्यटकांची संख्याही रोडावण्याची भीती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सनबर्नच्या आयोजकांवर कारवाई करावी. कारवाईत कसू सोडू नये, असं आवाहन पालेकर यांनी केलं आहे.

अखेर कारवाई

दरम्यान, सनबर्न फेस्टिव्हलवरून आप आणि काँग्रेस पार्टी आक्रमक झाल्यानंतर अखेर पोलिसांनी आयोजकांविरोधात कारवाई केली आहे. आयोजकांवर ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करणअयात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून आयोजकांना यापुढे असा प्रकार न करण्याची ताकीदही देण्यात आली आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.