IAS पत्नीच्या विरोधात पोलीस ठाण्यात महाभारत मालिकेतील कृष्ण, गंभीर आरोप करत…
nitish bharadwaj smita gate | महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज यांनी आयएसएस अधिकारी असलेल्या स्मिता गटे यांच्याशी विवाह केला होता. त्यांचे घटस्फोट झाले आहे. आता नितीश यांनी पत्नीविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई, दि. 15 फेब्रुवारी 2024 | आयएएस अधिकाऱ्यांची लग्न चर्चेत असतात. अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS पाहतात. अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा घटस्फोट देखील होतो. महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज यांनी आयएसएस अधिकारी असलेल्या स्मिता गटे यांच्याशी विवाह केला. परंतु ते स्वत:चा संसारही वाचवू शकले नाही. सप्टेंबर 2019मध्येच या दोघांच्या नात्यात वितुष्ट आले होते. त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नितीश भारद्वाज पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात पोहचले आहे. त्यांनी गंभीर आरोप केले आहे.
काय आहे नितीश भारद्वाज यांचे आरोप
नितीश भारद्वाज यांनी १४ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. त्यात त्यांनी पत्नी स्मिता हिने माझ्या मुलींचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर स्मिता मला मुलींची भेटू घेऊ देत नाही. माझ्या दोन्ही मुली कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत, हे विचारल्यावर तिच्याकडून काहीच उत्तर मिळत नाही. ती माझ्या मुलींना माझ्याविरोधात भडकवत असते.
मुलींची शाळाही बदलली
स्मिता हिने भोपाळपासून उटीपर्यंत बोर्डींग स्कूलमध्ये मुलींचे प्रवेश घेतले होते. परंतु त्या ठिकाणावरुन आता काढून टाकले आहे. चार वर्षांपासून मुलींची भेट झाली नाही. यापूर्वी अनेक वेळा पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. माझा मेल, व्हॉट्सअॅपचे काही उत्तर देत नाही, असे नितीश भारद्वाज यांनी म्हटले आहे.
कोण आहे स्मिता गटे
IAS स्मिता गटे यांचा जन्म पुणे शहरात झाला. पुण्यातील सेंट्रल स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. वाडिया कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर गरवारे कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्समधून समाजशास्त्रात एमए केले. स्मिता गटे या सनदी अधिकारी आहेत. नितीश भारद्वाज आणि स्मिता गेट यांचा विवाह १४ मार्च २००९ रोजी झाला. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. सप्टेंबर 2019मध्येच या दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं होतं.