Kangana Ranaut | पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला घेरलं, कार अडवत माफी मागण्याची केली मागणी
जोपर्यंत आमची माफी मागाणार नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा पंजाबच्या शेतकऱ्यांनी घेतला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंगनाला शेतकऱ्यांच्या गराड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मुंबई : आपल्या खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्यांनी वादाचे कारण ठरणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंजाबमध्ये असताना येथील शेतकऱ्यांनी कंगनाची गाडी आडवली. तिच्या गाडीला शेतकऱ्यांनी चहू बाजूनंनी घेरले होते. तसेच जोपर्यंत आमची माफी मागणार नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंगनाला शेतकऱ्यांच्या गराड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.
शेतकऱ्यांनी कंगनाला घेरले
मिळालेल्या माहितीनुसार कंगना रनौत कारमधून पंजाबमधील चंदीगड-उणा महामार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी येथील शेतकऱ्यांनी तिची कार थांबवत तिला घेरले. तसेच जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला. मात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कंगनाला संरक्षण दिले. तसेच तिची कार शेतकऱ्यांच्या गराड्यातून मुक्त केली. हा सर्व प्रकार घडत असताना कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.
WATCH: In a video posted on Instagram, actor #KanganaRanaut says, “As I entered Punjab a mob has attacked my car. They are saying they are farmers.” pic.twitter.com/cCmsjBwqRs
— Asianet Newsable (@AsianetNewsEN) December 3, 2021
मॉब लिंचिंगची शिकार झाले असते
“मी जेव्हा पंजाबमध्ये आले तेव्हा काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला. आम्ही शेतकरी असल्याचे ते सांगत आहेत,” असे कंगनाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. तसेच पंजाब पोलीस वेळेवर आले नसते तर आज मॉब लिंचिंगची मी शिकार झाले असते, असेदेखील कंगनाने म्हटले आहे.
I don’t know how come they got to know about #KanganaRanaut‘s travel plans..the situation is very scary and those people who keep asking about her Y+ security should now keep their mouth shvt pic.twitter.com/c3lKksSnRJ
— Kagura (@shinigamimaiden) December 3, 2021
कंगना सुरक्षित, इन्स्टाग्रामवर दिली माहीती
दरम्यान, पंजाब पोलिसांनी कंगनाला सुरक्षा पुरवत शेतकऱ्यांना बाजूला केले आहे. कंगनाला कोणतीही इजा झालेली नसून ती सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर पडली आहे. तशी माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिलीय. कंगनाने पंजाब पोलिसांचे आभार मानले आहेत. याआधी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना कंगनाने खलिस्तानी म्हटले होते. तसेच कृषी कायदे परत घेतल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यावर आंदोलन करणारे लोक कायदे तयार करत असतील तर हासुद्धा एक जिहादच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
इतर बातम्या :