G-20 : बायडेन यांच्यासोबत बैठकीनंतर PM मोदी म्हणाले, जगासाठी आमची मैत्री महत्त्वाची

बांगलादेश, मॉरिशस आणि अमेरिका यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, या बैठकी जगाला नवी दिशा देणारे ठरतील.

G-20 : बायडेन यांच्यासोबत बैठकीनंतर PM मोदी म्हणाले, जगासाठी आमची मैत्री महत्त्वाची
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:58 AM

नवी दिल्ली : G20 परिषद सुरू होण्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्वागत केले. दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये एकूण पंचेचाळीस मिनिटे द्विपक्षीय चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांचे सात प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीनंतर जो बायडेन मौर्या हॉटेलकडे रवाना झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन संध्याकाळी सात वाजता दिल्लीत उतरल्यानंतर थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली.

बायडेन यांच्यासोबतची भेट अर्थपूर्ण होती – पंतप्रधान मोदी

भेट आणि चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की आमची बैठक फलदायी ठरली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची आणि जो बायडेन यांची भेट खूप महत्त्वाची होती. आमची मैत्री जगासाठी खूप महत्त्वाची आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आम्ही पुढे नेऊ.

जो बायडेन यांच्या भेटीदरम्यान, पीएमओने ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 7 लोक कल्याण मार्गावर द्विपक्षीय चर्चा करत आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी घट्ट होतील.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत केले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार यांनी या काळात भारताच्या प्रगती आणि विकासाचे कौतुक केले आहे.

9 आणि 10 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या भेटीचे वेळापत्रक

9 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी जपान, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तर 10 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट होणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.