Vinod Tawade: राष्ट्रीय सरचिणीसपदानंतर विनोद तावडेंकडे आणखी मोठी जबाबदारी, भाजपाच्या केंद्रीय वर्तुळात तावडेंच्या कामगिरीकडे असणार लक्ष

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळीही, विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या काही राज्यांतील प्रवासाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. मुर्मु यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि मुर्मु यांची भेट व्हावी, यासाठी विनोद तावडे हे मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत होते.

Vinod Tawade: राष्ट्रीय सरचिणीसपदानंतर विनोद तावडेंकडे आणखी मोठी जबाबदारी, भाजपाच्या केंद्रीय वर्तुळात तावडेंच्या कामगिरीकडे असणार लक्ष
तावडेंकडे मोठी जबाबदारीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 9:11 PM

मुंबई- भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade)यांच्या जबाबदारीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. देशातील काही राज्यांच्या भाजपाच्या प्रभारी आणि सहप्रभारीपदांची यादी आज जाहीर करण्यात आली. त्यात विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची ( Bihar)जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर त्यांच्याकडे हरयाणाच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2020 मध्ये राष्ट्रीय सचिव झालेल्या विनोद तावडे यांना 2021 साली बढती मिळाली होती. त्यांना त्यावेळी राष्ट्रीय सरचिटणीसपदाची (General secretary)जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा बिहारसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी

बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या प्रभारीपदाची  जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. नितीशकुमार यांनी नुकतीच भाजपाशी फारकत घेऊन ते महाआघाडीत सामील झाले आहेत. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बिहार राज्याची जबाबदारी तावडेंकडे देण्यात आली आहे. बिहारमध्ये एकून ४० लोकसभा जागा आहेत. त्या भाजपासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. तावडे यांच्यासोबत हरीश द्विवेदी यांच्याकडे सहप्रभारीपद देण्यात आले आहे. विनोद तावडे यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या राज्यातील कामगिरीकडे केंद्रीय नेतृत्वासह देशाचे लक्ष असणार आहे.

विनोद तावडेंचे महत्त्व वाढले

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळीही, विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या काही राज्यांतील प्रवासाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. मुर्मु यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि मुर्मु यांची भेट व्हावी, यासाठी विनोद तावडे हे मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत होते. ही भेट झाली नसली तरी तावडे यांचे महत्त्व यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात अधोरेखित झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यातही त्यांनी आवर्जून विनोद तावडे यांची भेट घेतली होती. यावरुन त्यांचे दिल्लीतील राजकीय वजन वाढलेले असल्याचे दिसते आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय पातळीवर बसवला जम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थी चळवळीचे काम केल्यानंतर विनोद तावडे भाजपात सक्रिय झाले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तावडे बोरिवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर फडणवीस सरकराच्या काळात शिक्षणमंत्रीपद त्यांनी सांभाळले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी वर्षभर त्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना विधानसभेचे तिकिटही नाकारण्यात आले होते. त्यानंतचर २०२० साली त्यांना केंद्रीय पातळीवर राजकारण करण्याची संधी भाजपाने दिली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.