ऐश्वर्या राय हिच्यासंदर्भात राहुल गांधी काय बोलून गेले, नेटकरी भडकले
aishwarya rai and rahul gandhi | ऐश्वर्या रायसंदर्भातील वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले आहे. अनेक युजरने राहुल गांधी यांच्याबद्दल कॉमेंट केल्या आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासंदर्भातील वक्तव्य राहलु गांधी यांनी केले होते.
प्रयागराज, दि. 21 फेब्रुवारी 2024 | काँग्रेस नेता राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर आहे. यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी विविध विषयांवर भाष्य करत असतात. राम मंदिरसह अनेक विषयांवर त्यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आता राहुल गांधी यांनी ऐश्वर्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर राहुल गांधी चांगलेच ट्रोल झाले आहे. ऐश्वर्या रायसंदर्भात राहुल गांधी यांनी दावा केला होतो. हा दावा अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासंदर्भात होता.
काय म्हणाले होते राहुल गांधी
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ 22 जानेवारी रोजी झाला. या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करताना राहुल गांधी यांनी ऐश्वर्या राय आणि बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर कॉमेंट केले. राहुल गांधी म्हणाले, काय तुम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला? काय त्या ठिकाणी एकही ओबीसी चेहरा होता का? त्या ठिकाणी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि नरेंद्र मोदी होते. प्रयागराजमधील सभेतील राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Why is Rahul Gandhi obsessed with Aishwarya Rai ? pic.twitter.com/HZh06mN4kh
— Nidhi Bahuguna 𑆤𑆴𑆣𑆴🇮🇳 (@vinirish) February 19, 2024
ऐश्वर्या समारंभात होती का?
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभात ऐश्वर्या राय गेलीच नव्हती. या समारंभात अमिताभ बच्चन गेले होते. ऐश्वर्या राय हिला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण मिळाले नव्हते. अमिताभ बच्चन यांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभातील फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यातही ऐश्वर्या राय नव्हती.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
ऐश्वर्या रायसंदर्भातील वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले आहे. अनेक युजरने राहुल गांधी यांच्याबद्दल कॉमेंट केल्या आहेत. राहुल गांधी काहीही म्हणा, आता मोदीच येणार असल्याचे एका युजरने म्हटले आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, भटकंती करणारा व्यक्ती आहे. त्याला एखाद्या पक्षाचे सर्वोच्च पद मिळू शकते. परंतु देशातील सर्वोच्च पद मिळणार नाही. काही जणांनी राहुल गांधी यांना पप्पू म्हटले आहे.