15 पक्षांची पत्रकार परिषद, ममता म्हणाल्या, ‘रक्त सांडायला तयार’, तर मुफ्ती म्हणाल्या, ‘गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही’

बिहारची राजधानी पाटण्यात आज देशभरातील 15 विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक अतिशय सकारात्मक स्वरुपाची पार पडली आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे असे दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित होते.

15 पक्षांची पत्रकार परिषद, ममता म्हणाल्या, 'रक्त सांडायला तयार', तर मुफ्ती म्हणाल्या, 'गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही'
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 5:26 PM

पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यात आज विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. देशभरातील 15 शक्तीशाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज पाटण्यात बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली आहे. सर्व पक्षांनी आगामी काळात एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ही बैठक बोलावल्याबद्दल आभार मानले. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तसेच पुढच्या बैठकीत हीच चर्चा पुढे नेण्याबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढची बैठक शिमला येथे जुलै महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यान होईल, असं सांगितलं आहे.

देशासाठी एकत्र आलोय : उद्धव ठाकरे

“मी नितीश कुमार यांचा धन्यवाद मानतो. संपूर्ण देशाचे प्रमुख नेते इथे आले आहेत. प्रत्येकजण जाणतात की, आपण वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. मतभिन्नता असू शकते पण देश एक आहे. देशाची एकता आणि अखंडता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही देशासाठी एकत्र आलोय. देशात जे हुकूमशाही आणू पाहत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. सुरुवात चांगली झालीय. त्यामुळे पुढचा प्रवासही चांगलाच होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय : नितीश कुमार

“आज सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. इथे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, असे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते”, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“एकत्र चालण्याच्या मुद्द्यावर संमिती झालीय. सर्व पक्षांची पुन्हा एक बैठक बोलावण्यात आलीय. सर्वांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या बैठकीचं नियोजन मल्लिकार्जुन खर्गे करतील. कोण कुठे लढतील याबाबत निर्णय होतील. सर्वांनी देशाच्या हिताचा निर्णय घेतलाय. सध्याचं सरकार देशाच्या हिताच्या विरोधात काम करत आहे. आम्ही सर्व एकत्र येण्याचं ठरवलं आहे”, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

आम्हाला भाजपला सत्तेतून बाहेर काढायचंय : मल्लिकार्जुन खर्गे

“सर्व नेते भेटले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्व नेते एकत्र आले आहेत. सर्वांनी एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहोत. त्यासाठी पुढच्या महिन्यात ५ ते १० तारखेला शिमल्यात आणखी एक बैठक बोलावली जाईल”, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

“सर्व नेत्यांसोबत चर्चा करुन योग्य तारीख ठरवू. प्रत्येक राज्याच्यासाठी रणनीती ठरवून निर्णय घेऊ. आम्ही एकजुटीने 2024 ची निवडणूक लढवू. आम्हाला भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं आहे. त्यात आम्हाला यश येईल. संपूर्ण देश यामध्ये जोडला जाईल”, असंही खर्गे यावेळी म्हणाले.

मतभेद बाजूला सारुन एकत्र लढू : राहुल गांधी

“सर्व पक्षाचे वरिष्ठ नेता आले आहेत. मी त्यांचं सर्वांच स्वागत करतो. नितीश कुमार यांनी आज जेवणात बिहारचे सर्व खाद्य पदार्थांची चव चाखायला दिली. त्यासाठी धन्यवाद. भारताच्या मूळ गोष्टीवर आक्रमण होतोय. ही विचारधारेची लढाई आहे. यासाठी आपण सर्व एकत्र उभे आहोत”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आमच्यात जरुर काही मतभेद असू शकतात. पण आम्ही फ्लेक्सिबिलीटीने एकत्र काम करु. आम्ही आमच्या विचारधारेचं रक्षण करण्याचं ठरवलं आहे. आम्ही पुढच्या बैठकीत आणखी खोलवर चर्चा करु”, असं राहुल गांधी म्हणाले.

रक्त वाहिलं तरी चालेल पण आम्ही एकत्रपणे सामना करु : ममता बॅनर्जी

“आजच्या बैठकीत अनेक मुख्यमंत्री आले आहेत. खूप चांगल्या प्रकारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव आज भरपूर दिवसांनी बैठकीत आले. अनेक दिग्गज नेते आले. एक गोष्ट आहे. पाटण्यात बैठक घेण्यास मी सांगितलं होतं कारण पाटण्यातून जनआंदोलन सुरु होतं. आम्ही दिल्लीत बैठक घेतली. पण काहीच झालं नाही. पण पाटण्यात चांगली बैठक झाली”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“तीन गोष्टींवर शिक्कामोर्तब झाली. आम्ही एकत्र आहोत. एकत्र लढणार आणि आमची लढाई, आम्हाला विरोधक म्हणू नका. आम्ही सुद्धा नागरीक आहोत. आम्हीसुद्धा देशप्रेमी आहोत. भाजपच्या हुकूमशाही सरकारचा सामना करायचा आहे. जो कुणी काही बोललं तर त्याच्याविरोधात ईडी, सीबीआय कारवाई सुरु करतात”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“सरकार बेरोजगारीचा विचार करत नाही. महिलांवर अत्याचार होत आहेत. गावाचा विकास होत नाहीय. रक्त वाहिलं तरी चालेल पण आम्ही एकत्रपणे सामना करु. आता जर ते पुन्हा निवडून आले तर देशात परत निवडणूक होणार नाही. आम्ही भाजपचा सामना एकत्रितपणे करण्याचं ठरवलं आहे. आज इतिहासाला नवी सुरुवात होईल”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

शरद पवार काय म्हणाले?

“देशात आज अनेक समस्या आम्ही बघत आहोत. आम्ही सर्वांनी एकत्रपणे पुढे जाण्याचं ठरवलं आहे. पाटण्यात जे सुरु झालंय ते पुढे घेऊन जाईल याचा मला विश्वास आहे. देशातील अनेक आंदोलनं पाटण्यातून सुरु झाली आहेत. देशाची जनता आमचं समर्थन करणार याचा मला विश्वास आहे”, असं शरद पवार म्हणाले.

 गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही : मेहबुबा मुफ्ती

“सर्वजणांनी एकत्र जमणं हे नितीश कुमार यांचं यश आहे. आमच्या जम्मू काश्मीरपासून सुरुवात झाली. आता संपूर्ण देशात हे होत आहे. आम्ही महात्मा गांधी यांच्या विचारांशी हात मिळवले आहेत. अल्पसंख्यांकाना त्रास दिला जातोय. गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही”, असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

ही विचारधारेची लढाई : उमर अब्दुल्ला

“आजच्या बैठकीचं श्रेय नितीश कुमार यांना जातं. इतक्या लोकांना एकत्र करणं सोपी गोष्ट नाही. इथे कोण नाही ही गोष्ट जास्त महत्त्वाची नाहीय. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व पक्षांनी या बैठकीत सहभाग घेतली आहे. निवडणूक जिंकणं हे आमचं ध्येय नाही. ही विचारधारेची लढाई आहे”, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.

“देशाच्या मुल्यांना वाचवण्याची ही लढाई आहे. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. लोकशाहीला पुन्हा जीवंत करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये बोलताना पाहून बरं वाटलं. पण ते जम्मू काश्मीरमध्ये का येत नाही?”, असा सवाल त्यांनी केला.

“जम्मू काश्मीरमध्ये अजूनही राष्ट्रपती राजवट आहे. जम्मू-काश्मीरला पुन्हा निवडणूक व्हायला हवी. या बैठक्या चालत राहाव्या जेणेकरुन पुढच्या चार राज्यांमधील निवडणुका या सेमीफायनल सारख्या आहेत. आपल्याला जिंकायचं आहे”, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.