AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस पुन्हा तुष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल; वंदे मातरमचा वाद पेटला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या वंदे मातरमच्या दोन कडव्यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पुन्हा तुष्टीकरणाचे राजकारण करत असून हा देशविरोधी निर्णय आहे असे शाह म्हणाले. १९३७ मधील ऐतिहासिक चुकीची पुनरावृत्ती होत असून यामुळे देशाला मोठे नुकसान झाले आहे. भाजप या निर्णयाचा निषेध करत असून जनतेत जाऊन आवाज उठवेल.

काँग्रेस पुन्हा तुष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल; वंदे मातरमचा वाद पेटला
amit shahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2026 | 12:46 PM
Share

काँग्रेसने वंदे मातरमचे दोनच अंतरे गाण्याचा घेतलेला निर्णय हा देशविरोधी आहे. काँग्रेस पुन्हा एकदा तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं आहे. त्यांच्या या निर्णयाने आधीच देशाने मोठं नुकसान सोसलं आहे. पुन्हा एकदा काँग्रेस त्या दिशेनेच देशाला घेऊन जात असून हे धोकादायक आहे. आम्ही काँग्रेसच्या या निर्णयाचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी मीडियाशी संवाद साधताना काँग्रेसच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेसने वंदे मातरमचे दोन छंद गाण्याचा निर्णय घेतला आहे. 1937मध्ये काँग्रेसने मुस्लिमांसाठी वंदे मातरमचे दोन तुकडे करून देशाच्या विभाजनाची पायाभरणी केली होती. तिथूनच द्विराष्ट्राच्या सिद्धांताला सुरुवात झाली. त्यानंतर देशाची फाळणी झाली. पाकिस्तानचा जन्म झाला. आज ती ऐतिहासिक चूक केली जात आहे. वंदेमातरमला दीडशे वर्षा पूर्ण होत आहेत. मोदी सरकारे बंकीमचंद्र यांच्या अमर गीताला पूर्ण गाऊन राष्ट्रीय एकात्मतेला सुदृढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी ठिकाणी पूर्ण गीत गायचा निर्णय घेतला. त्याला कायद्याचं संरक्षणही दिलं. अशावेळी काँग्रेसने हा निर्णय घेणं चुकीचं आहे, अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

जनतेत जाऊन आवाज उठवणार

काँग्रेसचा हा निर्णय केवळ आणि केवळ मुस्लिमांच्या लांगूलचालण्याच्या धोरणाचं लक्षण आहे. त्यासाठीच त्यांनी बंकीमचंद्र यांच्या अमरकृतीचाच अपमान केला नाही, तर वंदे मातरमचा नारा देत फाशीवर गेलेल्या लाखो शहीदांचाही अपमान केला आहे. आज काँग्रेस पार्टी 1937मधील त्यांच्या पक्षाचं धोरण राबवत आहे. आणि देशाचा कायदा नाकारत आहे. राहुल गांधी चांगुलचालनाचं राजकारण पुढे नेत आहेत, त्याबद्दल आश्चर्य वाटतं. मला वाटतं त्यावेळी वंदे मातरमचे दोन तुकडे करण्याची चूक झाली. आम्ही त्याचे गंभीर परिणाम भोगले आहेत. आता देशाच्या जनतेने एकजूट व्हावं आणि काँग्रेसच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. तृष्टीकरणचं राजकारण सहन करणार नाही. हा स्वतंत्र देश आहे हे दाखवून दिलं पाहिजे, असं सांगतानाच भाजप काँग्रेसच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहे. आम्ही जनतेत जाऊन आणि विधानसभांमध्येही या विरोधात आवाज उठवणार आहोत, असं शाह म्हणाले.

संसदेत कायदा

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात दीर्घ चर्चेनंतर वंदे मातरमचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकानुसार वंदे मातरमचे सहाही कडवे गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर काँग्रेसच्या म्हणण्यानुसार देशाच्या महापुरुषांनीच वंदे मातरमचे दोन कडवे स्वीकारले होते. त्यामुळे आम्हीही दोनच कडवे गाणार. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता देशात नवीन वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात