युद्धानं तोडलं, प्रेमानं जोडलं ! दिल्ली विमानतळावर प्रपोज आणि युक्रेनची मुलगी बनली दिल्लीची सून

प्रेमात असलेली अ‍ॅनाने युद्धातही अनुभवबरोबर आपला संवाद चालूच ठेवला. ज्यावेळी त्यांचं शेवटचं बोलणं झालं, त्यावेळी मात्र अ‍ॅनाने ठरवले की, एका ना एक दिवस युक्रेनमधून बाहेर पडायचं आणि थेट भारत गाठायचा.

युद्धानं तोडलं, प्रेमानं जोडलं ! दिल्ली विमानतळावर प्रपोज आणि युक्रेनची मुलगी बनली दिल्लीची सून
Anna And Anubhav loveImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 8:05 AM

नवी दिल्लीः मराठी साहित्यात रणांगण ही विश्राम बेडेकरांची दुसऱ्या महायुद्धातील एका प्रेमकथेवर आधारित कादंबरी आहे. देश, भाषा, प्रांत आणि प्रदेश वेगवेगळे असले तरी प्रेम (Love) या एका गोष्टीमुळे जग किती जवळ येतं हे त्या कादंबरीत सांगितलं गेलं आहे. रशिया-युक्रेन युद्धातही (Russia-Ukraine War) कित्येक माणंस जवळच्या नात्यांना आणि माणसांना पोरकी झाली आहेत. मात्र या युद्धात एका प्रेमकथेचा (Love story) शेवट मात्र मोठ्या आनंदात झाला आहे. या प्रेमकथेतील लव्ह बर्डस आहे युक्रेनची अ‍ॅना आणि भारतातील अनुभव भसीन यांची. ही दोघं पहिल्यांदा भेटली ती 2019 मध्ये.

युक्रेनची अ‍ॅना कीवमधील एका खासगी कंपनीत काम करणारी मुलगी, ती ज्यावेळी 2019 मध्ये भारतात आली त्यावेळी अनुभवबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि त्यांची मग मैत्री झाली. तीही अगदी घट्ट.

यांची मैत्री, प्रेम झाल्यानंतर अ‍ॅना होरोडेत्स्का आणि दिल्ली उच्च न्यायालयात वकील असणाऱ्या अनुभव भसीन यांनी मार्च महिन्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, आणि दोघंही मार्च महिन्याचीच वाट बघ होते.

एक ना एक दिवस भारत गाठायचा

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर प्रेमात असलेले अनुभव आणि अ‍ॅना ही दोघं चिंताग्रस्त झाली. रशियाकडून जोरदार आक्रमन सुरु झाले आणि युक्रेनची राजधानी कीवमधील एका बंकरमध्ये अ‍ॅना लपून बसली, पण प्रेमात असलेली अ‍ॅनाने युद्धातही अनुभवबरोबर आपला संवाद चालूच ठेवला. ज्यावेळी त्यांचं शेवटचं बोलणं झालं, त्यावेळी मात्र अ‍ॅनाने ठरवले की, एका ना एक दिवस युक्रेनमधून बाहेर पडायचं आणि थेट भारत गाठायचा आपल्या अनुभवच्या प्रेमासाठी.

प्रेमातील लुटूपुटूचे वाद

अ‍ॅना आणि अनुभव या दोघांच्या प्रेमाचे किस्से युद्धातही अगदी ओतप्रोत भरले आहेत. त्यांच्या प्रेमात लुटूपुटूची भांडणंही आहेत पण ती प्रेमाची, आणि काळजीची आहेत, तिही युद्धभूमीवरच्या रणांगणावरची. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अॅना सांगते की, तिकडे युद्ध सुरु होते तसेच आमच्यातर वाद सुरु होते. त्या युद्धाच्या काळात अनुभव आणि माझ्यात तीन वेळा वाद झाले, पहिल्यांदा वाद झाला तो मला कीव सोडण्यास सांगत होता तर मी त्याला म्हणत होते की, रशिया युक्रेनवर आक्रमण करणार नाही हे पहिल्यांदा भांडण नंतर युद्धजन्य परिस्थितीत त्याने मला ट्रेनमध्ये बसण्याची विनंती केली तिही माझी इच्छा नसताना. तर तिसऱ्यांदा आम्ही भांडलो तर अनुभवने मला बंकरमध्ये बसण्यास सांगितले म्हणून. आम्ही एकमेकांबरोबर वाद घातले पण मी त्याला सांगितले की, थांब मी 17 मार्चपर्यंत मी दिल्लीत पोहचते आहे.

…आणि विमानतळावर विचारले “Will you…

दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर अ‍ॅनाचे आगमन आणि स्वागत झाले ते अगदी सामान्य होते, त्यात कोणताही बडेजाव नव्हता. स्वागत सामान्य असले तरी अ‍ॅना येणार म्हणून अनुभवन तिच्या आगमनासाठी एक ढोल मागविला होता. ती ज्यावेळी विमानतळावर आली तेव्हा ढोलाच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले आणि अगदी रोमँटीक होत अनुभव भसीनने सोन्याची रिंग हातात घेऊन, गुडघ्यावर बसून तिला विचारले की, “Will you marry me?”

भारतातील स्वागतावर अ‍ॅना फिदा

ती सांगते की, हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होते. कारण मी एवढ्या लांबून प्रवास करुन आल्यामुळे थकले होते, पण या त्याने ज्यासाठी मला सोन्याची रिंग देऊन विचारले होते, त्यासाठी त्याला हो म्हणाले. कारण त्याच्यासाठी मी युद्धातून वाट काढत त्याच्यापर्यंत पोहचले होते. त्यानंतर मी त्याच्या आईला भेटले, त्यांनी तर माझे स्वागत फुलांनी केले, आणि ते मला खूप सुंदर वाटले असंही ती भारतातील स्वागतावर सांगते.

फोन आणि भेट

खासगी कंपनीत काम करणारी अ‍ॅना 2019 मध्ये जेव्हा भारतात आली तेव्हा यांची भेट झाली होती. त्या भेटीत एकमेकांचे फोन नंबर घेऊन, व्हाटस्अ‍ॅपवर बोलणंही होई, त्यानंतर त्यांची मैत्री झाली. मात्र त्यानंत कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि पुन्हा त्यांची भेट लांबली लॉकडाऊननंतर ती राजस्थानच्या ट्रीपसाठी आली त्यावेळी अनुभवने तिला मदत केली.

विशेष कायद्यांतर्गत लग्न

लॉकडाऊननंतर दुबईमध्ये या दोघांची तिसऱ्यांदा भेट झाली तर चौथ्यांदा ती दोघं जेव्हा भारतात पुन्हा भेटली तेव्हा अनुभवच्या आईनेच अ‍ॅनाबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विशेष कायद्यांतर्गत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याच काळात युद्ध सुरु झालं आणि पुन्हा या गोष्टी लांबणीवर पडल्या पण त्या काळात लग्नासाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्यांनी तयार ठेवली असल्याचे अनुभव सांगतो.

लग्नासाठी दिलेली भेट

अ‍ॅना या भारतभेटीवर ती बेहद्द खूश आहे. म्हणून तिला आजीकडून मिळाली कॉफी मशिन तिने युद्धकाळातही आपल्याबरोबर ठेवली. ती मशिन घेऊन जाण्यास अनुभवचा विरोध असतानाही तिने ते बरोबर घेतले त्यावेळी तिने सांगितले की, ही फक्त कॉफी मशिन नाही तर ती आपल्या लग्नासाठी दिलेली भेट आहे. ती ती गोष्ट युद्ध असलं तरी ती मागे सोडणार नाही.

दोन वर्षांचा भारतीय व्हिसा

युद्धकाळात अ‍ॅना आपल्या आईसोबत ल्विव्हला पोहचल्यानंतर तिथून पोलंडमध्ये दोन आठवडे ती थांबली. त्यानंतर तिला दोन वर्षांचा भारतीय व्हिसा तिला मिळाला. तर तिच्या आईला नॉर्वेचा व्हिसा मिळाला आणि आई तिकडे रवाना झाली.

उरलेलं आयुष्य भारतात

युक्रेनमधील युद्धाचा मागोवा घेत अनुभव यांनी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकीलांबरोबर बोलून व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पोलंडमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने त्यांनी तिला व्हिसा मिळवून दिला. अ‍ॅना आता युक्रेनमधील रशियाचे आक्रमन थांबण्याची वाट बघते आहे. कारण तिचा बाओ नावाचा कुत्रा ती तिकडे आपल्या आजीकडे चेरकासी प्रांतात सोडून आली आहे. आपल्या आजीसाठी आणि कुत्र्यासाठी तिला एकदा तिकडे जायचे आहे, कारण अनुभव आणि अॅना 27 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. अ‍ॅना सांगते की, “युद्ध संपल्यावर मला कीवला परत जायचे आहे आणि माझा कुत्रा परत घ्यायचा आहे, कारण मला माझे आयुष्य भारतात घालवायचे आहे.

संबंधित बातम्या

Switzerland Family Suicide : पोलिस आल्याचे कळताच स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच कुटुंबाची सातव्या मजल्यावरुन उडी

Video : विनाड्रायव्हरची गाडी पुणे-नाशिक महामार्गावर, गाडीचा हँडब्रेक लावायला विसरल्यास काय होतं? पाहाच

अंबरनाथच्या वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी प्रकरणी 9 कंपन्यांना एमपीसीबीने बजावली नोटीस

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.