Jharkhad Crime: लज्जास्पद! झारखंडमध्ये चेटकीण असल्याचे सांगत वृद्ध महिलेला मारहाण

घरात बांधलेल्या शेळीलाही लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. नंतर इंद्रदेव आणि छोटू सिंगने तिला ओढत आपल्या घरी नेले. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इतर गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती गांडे पोलिसांना दिली.

Jharkhad Crime: लज्जास्पद! झारखंडमध्ये चेटकीण असल्याचे सांगत वृद्ध महिलेला मारहाण
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 11:52 PM

झारखंड : चेटकीण असल्याचा आरोप करीत एका 55 वर्षीय महिलेला जबर मारहाण केल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या पतीचे निधन झाले आहे. तिला एक विवाहित मुलगी असून ती तिच्या सासरी राहते. पीडिता आपल्या नातवासोबत घरी राहते.

चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेला मारहाण

गिरीडीहच्या गांडे पोलीस स्टेशन हद्दीतील बांधाबाद गावात शुक्रवारी रात्री एका 55 वर्षीय महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप करत तिच्यावर हल्ला करण्यात आला. तिला मलमूत्र पाजण्यात आले. याप्रकरणी शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 15 दिवसांपूर्वी इंद्रदेव सिंह यांचा मुलगा रणजीत सिंह बुधई जत्रा पाहण्यासाठी दुसऱ्या गावात गेला होता. तेथून घरी परतताना रणजित सिंग एका अपघातात जखमी झाला. त्यानंतर देवघर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रणजितच्या वडिलांचे म्हणणे होते की, पीडिता ही चेटकीण होती. त्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

महिलेसोबत शेळीलाही मारहाण

शुक्रवारी रात्री एक वाजता गावातील इंदरदेव सिंग, नुनू लाल सिंग, छोटू सिंग, सुनील सिंग आणि धनेश्वर सिंगची पत्नी पीडितेच्या घरी पोहटले आणि तिच्यावर डायन असल्याचा आरोप करु लागले. यानंतर पीडितेला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. घरात बांधलेल्या शेळीलाही लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. नंतर इंद्रदेव आणि छोटू सिंगने तिला ओढत आपल्या घरी नेले. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इतर गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती गांडे पोलिसांना दिली.

आपल्या नातवासोबत एकटी राहते पीडिता

घटनेची माहिती मिळताच गांडे स्टेशन प्रभारी सौरभ राज आपल्या टीमसह रात्री बांधाबाद गावात पोहोचले आणि महिलेला तिच्या घरी घेऊन गेले. पीडितेच्या पतीचा 10 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. महिलेला एकुलती एक मुलगी आहे. ती तिच्या सासरच्या घरी राहते. ही महिला तिच्या 10 वर्षांच्या नातवासोबत गावात राहते. (An old woman was beaten up in Jharkhand for being a witch)

इतर बातम्या

Mhada Exam: आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला, नवी तारीख म्हाडा ठरवणार

Raigad Crime : माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.