भीषण धडकेत दोन्ही वाहनांनी घेतला पेट, आगीत होरपळून 5 जणांचा जागीच मृत्यू
एका टाटा सुमोचा आणि ट्रकची एकमेकांना धडक झाली आहे. धडक होताच दोन्ही वाहनांनी पेट घेतला.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) इथं एका भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये 5 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास कडपाच्या वल्लूरू मंडलमधील एका गावाजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. (andhra pradesh road accident 5 people burnt)
मिळालेल्या माहितीनुसार, एका टाटा सुमोचा आणि ट्रकची एकमेकांना धडक झाली आहे. धडक होताच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात सुमोतील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. घटना घडताच स्थानिक लोकांनी तात्काळ सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सुमोमध्ये अवैध चंदनाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटना कळताच स्थानिक सीआय घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Andhra Pradesh: Five persons died in a road accident as two cars hit a tipper truck carrying diesel at around 3 am today near Kadapa airport. While four died on the spot after vehicles caught fire, one person succumbed to injuries undergoing treatment at RIMS, Kadapa pic.twitter.com/zbT8cIQzmA
— ANI (@ANI) November 2, 2020
उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू उत्तर प्रदेशमधल्या बहराईच-अयोध्या रोडवर एका वाहनाची अनेक वाहनांच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस उपअधीक्षक टीएन दुबे यांनी सोमवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये 16 लोक बसले होते. हे सर्व लखीमपूर जिल्ह्यातील सिंगही पोलीस स्टेशन भागातील रहिवासी असून ते रविवारी किछौछा दर्गा इथं आपल्या घरी परतत होते.
इतर बातम्या –
तुम्हीही करताय ऑनलाइन व्यवसाय तर सावधान, क्षणात होऊ शकतात अकाऊंटमधले पैसे गायब
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही : गिरीश महाजन
#PROMO | इराणला वेसण कोण घालणार? पाहा स्पेशल रिपोर्ट आज रात्री 10.28 वाजता @TV9Marathi वर @umeshk73 @NikhilaMhatre @KadamGtk @Manikmundhe pic.twitter.com/zp3CYuAbRm
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
(andhra pradesh road accident 5 people burnt)