परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास परवानगी दिल्यानं निलंबन! कलबुर्गीमधील घटना, आतापर्यंत 8 शिक्षक सस्पेंड

Hijab Controversy: आश्चर्याची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या दरम्यान हिजाब (Hijab Issue) घालण्यास परवानगी देणाऱ्या या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. सात दिवसांपूर्वीच काही शिक्षकाचं हिजाबला परवानगी दिल्यामुळे निलंबन करण्यात आलं होतं.

परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास परवानगी दिल्यानं निलंबन! कलबुर्गीमधील घटना, आतापर्यंत 8 शिक्षक सस्पेंड
बंदी असतानाही परवानगी का दिली?Image Credit source: Economic Times
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 4:28 PM

कर्नाटक : हिजाबच्या मुद्द्यावरुन कर्नाटकचा (Karnataka Hijab Controversy) राजकीय वातावरणं ढवळून निघालं आहे. सात दिवसांच्या आत आणखी एका शिक्षकाला आपली नोकरी हिजाबच्या मुद्द्यामुळे गमवावी लागली आहे. कलबुर्गीमध्ये एका शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. या शिक्षकानं एका विद्यार्थीनीला हिजाब घालण्यास परवानगी दिली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या दरम्यान हिजाब (Hijab Issue) घालण्यास परवानगी देणाऱ्या या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. सात दिवसांपूर्वीच काही शिक्षकाचं हिजाबला परवानगी दिल्यामुळे निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यात (Kalburgi District in Karnataka) आणखी एक शिक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आतापर्यंत 8 शिक्षक सस्पेंड

बुधवारी सात शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं होतं. या सातही शिक्षकांना विद्यार्थींनींना परीक्षेदरम्यान हिजाब घाण्याची परवानगी दिली होती. कर्नाटकच्या गडाह जिल्ह्यामध्ये सात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता कलबुर्गीमधील निलंबनाच्या कारवाईनंतर या संपूर्ण प्रकाराची चौकशीही केली जाणार आहे.

जानेवारी महिन्यात हिजाबचा मुद्दा सगळ्यात आधी समोर आला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण फक्त कर्नाटक राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर चर्चेत आलं होतं. यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा संघर्ष पाहायला मिळाला होता. दरम्यान, 15 मार्च रोजी हिजाब बंदीच्या बाजूनं निकाल दिला होता. शाळांमध्ये हिजाब घालण्याच बंदीच असेल, असं म्हणत या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या होत्या. शाळेचा गणवेश विद्यार्थिनींसाठी बंधनकारक असेल, असं कोर्टानं म्हटलं होतं.

हिजाबचा वादाची सुरुवात कुठून झाली?

कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातून जानेवारी महिन्यात हिजाब वादाची सुरुवात झाली होती. या ठिकाणी असलेल्या पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारण्यात आला होता. यानंतर एका शैक्षणिक संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्यात आला आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून कर्नाटकातील शैक्षणिक संस्था एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

दरम्यान, हा वाद सुरु होण्यापूर्वी महाविद्यालयात येणाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या, असाही एक दावा केला जातो. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थीनींना प्रवेश नाकारला होता. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतलेली. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, असं विद्यार्थीनींचं म्हणणं होतं. मात्र अखेर उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती.

संबंधित बातम्या :

Hijab Controversy : शाळेत जाताना शाळेचा गणवेशच हवा, उद्या कुणीही उठून काहीही करेल-तृप्ती देसाई

बिकिनी असो की घुंगट! अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या मुलीच्या समर्थनात प्रियंका गांधींचं ट्विट, ट्विटरवर #Bikiniचा पूर

Video | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिले 5 लाख! कुणी दिलं बक्षिस?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.