देशातल्या महागाईला, बोरोजगारीला अकबर, शहाजहान, औरंगजेब जबाबदार आहेत का, ओवेसींचा सवाल, काश्मिरात 370 हटविले तरी टीव्ही स्टारची हत्या कशी?

सध्या देशात सगळीकडे मशिदी खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ताजमहाल, लाल किल्ला इथेही खोदकाम करण्याची मागणी होते आहे. तिथे भाजपा, संघवाले काय शोधत आहेत. भाजपा, संघ परिवार द्वेष पसरवून भारतीय मुसलमानांविरोधात युद्ध करत आहेत. मुस्लिमांच्या प्रत्येक निशाण हे मिटवू इच्छितात, अशी टीका त्यांनी केली

देशातल्या महागाईला, बोरोजगारीला अकबर, शहाजहान, औरंगजेब जबाबदार आहेत का, ओवेसींचा सवाल, काश्मिरात 370 हटविले तरी टीव्ही स्टारची हत्या कशी?
owaisi on ModiImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 10:49 PM

भिवंडी – देशातल्या महागाईला, (inflation)बेरोजगारीला अकबर, शहाजहान आणि औरंगजेब (Aurangjeb)जबाबदार आहेत का, असा प्रश्न असुदुद्दीन ओवेसी (AIMIM Asaduddin Owaisi )यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी सरकारची सत्तेत आठ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याचा आनंद साजरा करण्यात येत आहे. मात्र तरीही देशात होत असलेल्या हत्या, दंगलींना जबाबदार कोण, असा प्रश्न ओवेसी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आले, मात्र तरीही तिथल्या हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मिरात नुकतीच एका टीव्ही स्टारची हत्या कशी झाली, काश्मिरी पंडितांची हत्या का होतायेत, असा सवालही त्यांनी विचारला आहे. काश्मिरात दहशतवाद वाढतोय, याला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. देशात महागाई सर्वात जास्त असताना मोदी सरकारची आठ वर्ष पूर्ण होत आहेत. देशात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्याकडे या सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील महिलांचे काम करण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे. परदेशी गुंतवणूक, गुंतवणूकदार कमी होत आहेत, याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हा देश आदिवासी आणि द्रविडींचा आहे

भारतावर मुसलमानांनी आक्रमण केले, पण ते मुघलांपासून सुरु झाले का, असा सवालही ओवेसी यांनी केला आहे. गेल्या ६५ हजार वर्षांपासून या देशात बाहेरुन लोक येत आहेत. ६५ हजार वर्षांपूर्वी इथे अफ्रिकन आले, तयानंतर ४५ हजार वर्षांपूर्वी इराणमधून शेतकरी इथे आले. मध्य आणि पूर्व आशियातूनही ४ हजार वर्षांपूर्वी आर्य आले, असे ओवेसी म्हणाले. हा भारत देश आपला, मोदी, शहा, ठाकरे यांचा नाही तर तो आदिवासी आणि द्रविडियनचा आहे, असा युक्तिवादही ओवेसींनी केला आहे. भारतातील मुसलमानांचा संबंध मुघलांशी नव्हता, ते बादशाहा होते त्यांचा संबंध जनतेशी नव्हता असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

सगळीकडे मशिदी खोदण्याचे काम सुरु

ज्ञानवापीवर जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा आपले पूर्वज ब्राह्मण होते, अशी टीका संघ परिवारातून करण्यात आली होती. जर तुम्ही ७००, ८०० वर्षांपूर्वींची बाब काढत असाल तर मी ६५ हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी काढीन, असे त्यांनी सांगितले. आमच्या पूर्वजांनी इथेच जन्म घेतला त्यामुळे हा आमचाच देश आहे. त्यामुळे आम्ही इथलेच आहोत, असेही त्यांनी सांगितले. सध्या देशात सगळीकडे मशिदी खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ताजमहाल, लाल किल्ला इथेही खोदकाम करण्याची मागणी होते आहे. तिथे भाजपा, संघवाले काय शोधत आहेत. भाजपा, संघ परिवार द्वेष पसरवून भारतीय मुसलमानांविरोधात युद्ध करत आहेत. मुस्लिमांच्या प्रत्येक निशाण हे मिटवू इच्छितात, अशी टीका त्यांनी केली. त्यात मशीद, मिनारे, आनाज, बुरखा, दाढी यांचा समावेश आहे. आणि यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सपा, आप सगळ्यांचे मौन आहे. हे स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, पण ते यावर बोलत नाहीत, कारण त्यांना हिंदू मते दूर जातील ही भीती आहे. असेच सुरु राहिले तर देशातील मुस्लीम आणि दलित तरुण त्यांच्या घरातच बसतील. या द्वेषाच्या अंधारातून बाहेर पडायचे असेल तर एमआयएम हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.