मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!

कोरोना व्हॅक्सिनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्लीत पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे 25 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Arrest me too, Rahul Gandhi tweets poster criticising Modi)

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 4:05 PM

नवी दिल्ली: कोरोना व्हॅक्सिनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्लीत पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे 25 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांना जामीनही मिळाला आहे. मात्र, या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. (Arrest me too, Rahul Gandhi tweets poster criticising Modi)

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर हे पोस्टरच शेअर केलं आहे. त्यात या दोघांनी मलाही अटक करा, असं म्हटलं आहे. तसेच मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली? असं हिंदीत लिहिलेलं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून नेटकरी हे पोस्टर व्हॉट्सअॅपवर डीपी म्हणून ठेवण्यास एकमेकांना सांगत आहेत.

काय आहे प्रकरण?

गुरुवारी रात्री पोलिसांना दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यावर मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन विदेशात का पाठवली? असं लिहिलं होतं. दिल्ली पूर्व, नार्थ ईस्ट, सेंट्रल, नॉर्थ, रोहिणी आणि द्वारका जिल्ह्यात हे पोस्टर लावलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हे पोस्टर कुणी लावले, कुणाच्या इशाऱ्यावरून लावले याचा शोध पोलीस घेत आहेत.

मास्क घालावेच लागणार

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्गाचा हाहाकार उडाल्याने देशातील नागरिकांना मास्क घालावा लागणार आहे. अमेरिकेत सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccine) घेतलेल्यांनी मास्क उतरवले आहेत. सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन अर्थात CDC च्या सूचनेनंतर अमेरिकेने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र अमेरिकेप्रमाणे सध्या भारतातील वातावरण तसं नाही. त्यामुळे भारतात जरी दोन्ही डोस घेतले असतील,तरी मास्क लावणं आवश्यक असल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Dr Randeep Guleria) यांनी सांगितलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही भारतात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे, असं डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं नवं रुप समोर येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यामुळे जसं अमेरिकेत मास्क उतरवला आहे, तसं भारतात अजिबात करु नका, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. (Arrest me too, Rahul Gandhi tweets poster criticising Modi)

संबंधित बातम्या:

Tauktae Cyclone | जम्बो कोव्हिड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर ते रुग्णालयात बॅकअप यंत्रणा, राज्य शासनाची नेमकी तयारी काय?

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा; मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश

(Arrest me too, Rahul Gandhi tweets poster criticising Modi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.