Earthquake : 30 सेकंदात 9 दगावले, दिल्लीच नव्हे 9 देश एकाचवेळी भूकंपाने हादरले; पाकिस्तानात सर्वाधिक नुकसान
काल रात्री भारतासह नऊ देेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तानात भूकंपामुळे एक इमारत कोसळली असून त्यात 9 जण ठार झाले आहेत.
नवी दिल्ली : काल रात्री दिल्लीसह आशियातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भारतासह एकूण 9 देशात काल भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे तब्बल 40 सेकंद जमीन हादरली. त्यामुळे लोक घारबले आणि जीवमुठीत घेऊन आहे त्या अवस्थेत घराबाहेर पळाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचा एपिसेंटर अफगाणिस्तानाच्या फैजाबादपासून 133 किमी अंतरावर दक्षिण पूर्वेकडे होता. भूकंपाचं केंद्र जमिनीच्या आत 56 किलोमीटरवर होते. हिंदूकुश पर्वत असलेल्या या परिसरात नेहमीच भूकंप येतात. भूकंपाचे झटके अफगाणिस्तान आणि चीनसह नऊ देशात जाणवले.
भूकंपामुळे अफगाणिस्तानात कोणतेही नुकसान झाले नाही. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 9 लोक ठार झाले आहेत. तर 186 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये भूकंपामुळे इमारत कोसळल्याने नऊ लोक दगावले आहेत. आशिया खंडात तुर्कमेनिस्तान, तझाकिस्तान आणि उज्बेकिस्तानमध्येही भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. या देशांमध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
भूकंपाचे झटके कुठे कुठे?
भारत
पाकिस्तान
अफगानिस्तान
कझाकिस्तान
चीन
तुर्कमेनिस्तान
ताझिकिस्तान
उज्बेकिस्तान
किर्गिस्तान
हिंदूकूश पर्वत हादरला, 11 दिवसात पाच झटके
21 मार्च- 6.6 तीव्रतेचा भूकंप
18 मार्च- 5 तीव्रतेचा भूकंप
12 मार्च- 4.5 तीव्रतेचा भूकंप
11 मार्च- 4.5 तीव्रतेचा भूकंप
10 मार्च- 4.5 तीव्रतेचा भूकंप
भारतात कुठे कुठे झटके?
दिल्ली
उत्तर प्रदेश
जम्मू-कश्मीर
पंजाब
राजस्थान
उत्तराखंड
मध्य प्रदेश
हिमाचललाही झटका
दरम्यान, दिल्लीत भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर रात्री हिमाचल प्रदेशातही 12 वाजून 51 मिनिटाने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली. या भूकंपानंतर जम्मू काश्मीरमधील मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
ते 30 सेकंद
दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, श्रीनगर, शिमला, मंडी, देहरादून, उत्तरकाशी, चमोली, मसूरी, अमृतसर, मोगा, भठिंडा, मानसा, पठानकोट, जालंधर, गुरदासपूर, होशियारपूर, मुरादाबाद, सहारनपूर, शामली, लखनऊ आदी ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे या भूकंपामुळे संपूर्ण उत्तर भारत हादरून गेला. 30 सेकंदापर्यंत जमीन हादरली होती. त्यामुळे लोक पटकन घराच्या बाहेर पडले.