AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या ISI च्या संपर्कात, अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याच्या कट, हँड ग्रेनेडसह एकास अटक

Ayodhya Ram Mandir: गुजरात अँटी टेररिस्ट स्कॉड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त ऑपरेशन करुन राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात 19 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

पाकिस्तानच्या ISI च्या संपर्कात, अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याच्या कट, हँड ग्रेनेडसह एकास अटक
| Updated on: Mar 03, 2025 | 5:50 PM
Share

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. दहशतवादी हल्ला करणारा युवक पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. त्याने आयएसआयकडून प्रशिक्षण घेतले होते. हल्ला करण्यासाठी त्याने राम मंदिराची रेकी केली होती. त्याने योजना अंमलात आणण्यापूर्वी गुजरात अँटी टेररिस्ट स्कॉड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त ऑपरेशन करुन त्याला अटक केली. तो उत्तर प्रदेशातील फेजाबाद (अयोध्या) येथे राहतो. अब्दुल रहमान (19) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी अब्दुल रहमान पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. तो राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. फैजाबादमध्ये मटन शॉप चालवणारा अब्दुल रहमान हा कट्टवादी लोकांच्या संपर्कात आला होता. आयएसआयने राम मंदिराच्या निर्मितीनंतर त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला होता. त्यासाठी अब्दुल रहमान याला प्रशिक्षण दिले होते.

राम मंदिराची केली होती रेकी

अब्दुल रहमान याने हल्ला करण्यासाठी राम मंदिराची रेकी केली होती. त्याने सुरक्षा संदर्भातील महत्वाची माहिती आयएसआयला पुरवली होती. राम मंदिराचे हँड ग्रेनडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची त्यांची योजना होती. त्यासंदर्भात गुजरात एटीएसला इनपुट मिळाले. त्यानुसार फरीदाबाद पोलिसांच्या संयुक्त विद्यामान आरोपीला अटक केली.

केंद्रीय तपास संस्थांकडून चौकशी

फैजाबादमधून ट्रेनने अब्दुल रहमान आधी फरीदाबादमध्ये दाखल झाला होता. त्या ठिकाणी एका हँडलरने त्याला हँड ग्रेनेड दिले. योजनेनुसार, पुन्हा ट्रेनने अयोध्या पोहचून हल्ला करायचा होता. परंतु त्यापूर्वीच सुरक्षा संस्थांना त्याची माहिती मिळाली. त्यानंतर रविवारी अब्दुल रहमान याला अटक केली. त्याची हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास संस्था कसून चौकशी करत आहे. त्याच्या मोबाईल आणि इतर साहित्याच्या माध्यमातून तपास केला जात आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.