पहिला पाकिस्तानी ज्याने अयोध्येत जाऊन घेतले रामलल्लाचे दर्शन, भावूक होत म्हटले…

Shri Ram Mandir | दर्शन घेतल्यानंतर पाकिस्तानातून आलेला भाविक चांगलाच भावूक झाला आहे. त्याने यासंदर्भात एक व्हिडिओ केला आहे. एका दिवसात हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी कॉमेंट करत त्याचे कौतूक केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पहिला पाकिस्तानी ज्याने अयोध्येत जाऊन घेतले रामलल्लाचे दर्शन, भावूक होत म्हटले...
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 10:55 AM

इस्लामाबाद, दि. 16 फेब्रुवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहेत. अयोध्येतील मंदिर पाहून आणि भगवान श्रीराम यांचे दर्शन घेऊन अनेक जण भावूक होत आहे. शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला आपल्या भवनात विराजमान झाल्याचा आनंद सर्व भाविकांना येत आहे. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमधून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. पाकिस्तानमधून आलेला ब्लॉगर आणि युट्यूबर विनय कपूर यानेही अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेतले. रामलल्लाच्या दर्शनासाठी पाकिस्तानातून आलेला तो पहिला व्यक्ती ठरला आहे. दर्शन घेतल्यानंतर तो चांगलाच भावूक झाला आहे. त्याने यासंदर्भात एक व्हिडिओ केला आहे. एका दिवसात हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.

रिमझिम पावसात दर्शनाला

युट्यूबर आपला व्हिडिओ शेअर करताना विनय कपूर याने म्हटले आहे की, अयोध्यात मंदिरात दर्शन घेणे आणि अयोध्या फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय राहिला. अयोध्येतील गल्ल्यांमध्ये फिरण्याचे स्वप्न सत्यात उतरले.  अयोध्येत आल्यानंतर मी स्वत:ला नशीबवान समजत आहे. अयोध्येत आपण पायीच फिरलो. अयोध्येतील गल्ल्यांमधून फिरुन ‘माखन मिसरी’ (दहीसाखर) खाऊन रिमझिम पावसात भगवान रामाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचलो, असे व्हिडिओत त्याने म्हटले.

हा क्षण आयुष्यभर कधीच विसरणार नाही

मंदिरात प्रवेश होताच विनय कपूर म्हणाला, मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करु शकत नाही. मला माझ्या नशिबावर अभिमान वाटत आहे. भगवान राम यांनी त्यांच्या दरबारात मला दर्शनासाठी बोलवले. हा एक अद्भभूत क्षण आहे. हा क्षण आयुष्यभर कधीच विसरता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

अयोध्येतील व्यवस्थेचे विनय कपूर याने कौतूक केले. सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात समाधान व्यक्त केले. सिमेंट न वापरता राजस्थानी शैलीमध्ये मंदिर केले गेले आहे, त्यामुळे मंदिराची भव्यता अधिक झाली आहे. राम मंदिराच्या दर्शनानंतर विनय कनक भवनात गेला. त्या ठिकाणी भगवान राम आणि सीता राहत होते. त्यानंतर अयोध्येतील लता चौकाचा फेरफटका मारला. सरयू नदीचे दर्शन घेतले. लक्ष्मण घाट आणि लक्ष्मण किल्ला पाहिला. सध्या ज्या पद्धतीने अयोध्येत काम सुरु आहे, ते पाहता येत्या काळात अयोध्याचा विकास वेगाने होईल.

हे ही वाचा

राम मंदिरासाठी धनवर्षा, दानाची मोजणी करताना थकताय 14 कर्मचारी

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.