इस्त्राईलच्या एंटी ड्रोनमुळे अयोध्या राम मंदिराची अभेद्य सुरक्षा, शत्रूंचा हवेतच खात्मा होणार

Ram Mandir | अयोध्या येथील राम मंदिरात गेल्या सहा दिवसांत लाखो भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. प्रशासनाकडून भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. आता राम मंदिराच्या सुरक्षेवर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

इस्त्राईलच्या एंटी ड्रोनमुळे अयोध्या राम मंदिराची अभेद्य सुरक्षा, शत्रूंचा हवेतच खात्मा होणार
अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 7:37 AM

अयोध्या, दि.29 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची गर्दी वाढत आहे. अयोध्येत कडाक्याची थंडी आहे. त्यानंतरही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहे. गेल्या सहा दिवसांत लाखो भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. प्रशासनाकडून भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. आता राम मंदिराच्या सुरक्षेवर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. राम मंदिराची सुरक्षा जमिनीप्रमाणे हवेत होणार आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी इस्त्राईलच्या एंटी ड्रोन बसवण्यात येणार आहे. यामुळे 3-5 किलोमीटर आधीच शत्रूचा खात्मा होणार आहे.

प्रथमच उत्तर प्रदेश पोलीस घेणार तंत्रज्ञान

उत्तर प्रदेश पोलीस प्रथमच एंटी ड्रोन प्रणाली घेणार आहे. नुकतेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दरम्यान पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी), विशेष सुरक्षा समूह (एसपीजी) आणि एंटी-ड्रोन प्रणालीचा वापर केला होता. परंतु एंटी ड्रोन प्रणाली ही केंद्र सरकारच्या सुरक्षा संस्थांची होती. आता मंदिरात कायमस्वरुपी ही प्रणाली बसवण्यात येणार आहे. यासाठी इस्त्राईलमध्ये निर्मिती एंटी-ड्रोन सिस्टमची वेगवेगळ्या पातळीवर चाचणी करण्यात आली.

3-5 किलोमीटर आधीच शत्रूचा खात्मा

ड्रोन सिस्टीम तिच्या 3 ते 5 किलोमीटर परिसरात येणाऱ्या ड्रोन शोधून काढेल. तसेच तिच्या शक्तीशाली रडारमुळे ते ड्रोन निष्क्रिय केले जाईल. परिस्थिती पाहून पोलीस रडारला यासंदर्भातील कंमाड देतील. लेझरवर आधारित या डिस्टॉयर सिस्टमचा वापर शत्रूंचा ड्रोनविरोधात केला जातो. या प्रणालीसोबत स्नायपर्स तैनात करण्यात येणार आहे. या स्नायपर्सला हार्ड किलचे प्रशिक्षण दिले जाईल. जे लेझर किंवा अन्य टेक्नोलॉजीचा वापर करुन शत्रूंचा ड्रोनोचा नायनाट करणार आहे.

हे सुद्धा वाचा

यूपी पोलिसांकडून 10 एटी-ड्रोन यंत्रणा खरेदी करण्यात येणार आहेत. यासंदर्भात बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘लखनऊ, वाराणसी आणि मथुरा यासारख्या राज्यभरातील संवेदनशील शहरांमध्ये ही प्रणाली बसवण्यात येणार आहे. एन्टी ड्रोन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच हे ड्रोन दाखल होणार आहेत.

हे ही वाचा

चेहरा झाकून अयोध्येतील राम मंदिरात पोहचला हा दिग्गज, त्यानंतर ओळखला गेला अन्…

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.