अयोध्या राम मंदिराची कडक सुरक्षा व्यवस्था भेदली, असा कॅमेऱ्यांचा वापर करत…
Ayodhya Ram Mandir Security Lapse: अयोध्यातील राम मंदिराची सुरक्षा उत्तर प्रदेश सरकारने स्पेशल सिक्योरिटी फोर्सकडे दिली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे पोलीस आणि जवान आहेत. यापूर्वी ही सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफच्या सहा बटालियन आणि पीएसीच्या १२ कंपन्यांकडे होती.
Ayodhya Ram Mandir Security Lapse: अयोध्यातील राम मंदिराची कठोर असलेली सुरक्षा व्यवस्था भेदली गेली आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था भेदत चश्मात असलेल्या कॅमेऱ्याने मंदिराचे फोटो घेणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्तचर संस्थाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ निर्माण झाली आहे. सुरक्षा प्रक्रियेत सापडला नाही…
सोमवारी रामलल्लाच्या दर्शनासाठी एक युवक आला. त्याने कॅमेरा असणारा चश्मा लावला होता. सुरक्षेच्या सर्व तपासण्या पार करत तो कॅमेराचा चश्मा घेऊन थेट मंदिरात दाखल झाला. त्यानंतर मंदिर परिसरात फोटो काढू लागला. एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याला त्वरित ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला गुप्तचर संस्थाकडे देण्यात आले. त्याने जो चश्मा घातला होता, त्याच्या फ्रेममध्ये दोन कॅमेरे लावले होते. त्यामुळे तो मंदिर परिसरातील फोटो सहज घेत होता. विशेष म्हणजे एकाही चेकींग पोईंटवर त्याला रोखण्यात आले नाही.
राम मंदिराची सुरक्षा स्पेशल सिक्योरिटी फोर्सकडे
अयोध्यातील राम मंदिराची सुरक्षा उत्तर प्रदेश सरकारने स्पेशल सिक्योरिटी फोर्सकडे दिली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे पोलीस आणि जवान आहेत. यापूर्वी ही सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफच्या सहा बटालियन आणि पीएसीच्या १२ कंपन्यांकडे होती. आता मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक कशी झाली? त्याचा तपास केला जात आहे. सुरक्षेच्या कारणामुळे आरोपीची ओळख जाहीर केली गेली नाही.
वर्धापन दिनाची जोरदार तयारी
अयोध्येतील राम मंदिराच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन रामलल्लाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत जवळपास 10,000 मठ आणि मंदिर आहे. मंदिरांच्या या शहरात भगवान यांचा जन्मस्थानावर बनलेल्या भव्य महलमध्ये रामलल्ला विराजमान झाले आहेत. त्याचा वार्षिक उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. अयोध्येतील घराघरात त्याची तयारी सुरु आहे.