देशात पहिल्यांदाच मुख्यमंत्री बेपत्ता… शोधून द्या, 11 हजार रुपये घेऊन जा; भाजपकडून बक्षीस जाहीर
भूखंड घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांना ईडीकडून कधीही अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच सोरेन बेपत्ता झाले आहेत. सोरेन यांच्या मतानुसार ते बजेचटच्या कामात व्यस्त आहेत. भाजपने मात्र, सोरेन यांना फरार घोषित केलं आहे. सोरेन यांचा पत्ता सांगणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणाही भाजपने केली आहे. त्यामुळे सोरेन मुद्द्यावरून झारखंडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
रांची | 30 जानेवारी 2024 : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. देशातून मुख्यमंत्री बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोरेने नेमके कुठे गेले आहेत याची कुणालाच माहिती नाही. त्यांच्या प्रोटोकॉल विभागालाही त्याबाबतची माहिती नाहीये. ईडीचे अधिकारी सोरेन यांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे सोरेन यांच्यावर भाजपने बक्षीसही जाहीर केलं आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.
माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. झारखंडच्या जनतेने मुख्यमंत्र्यांचा शोध घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या भीतीने गायब झाले आहेत. गेल्या 40 तासांपासून त्यांचा काहीच शोध लागत नाहीये. लोकलज्जा सोडून मुख्यमंत्री गायब झाले आहेत. आपलं तोंड लपवून फिरत आहेत, अशी टीका बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.
11 हजाराचं बक्षीस
मुख्यमंत्र्यांचं अशा गायब होण्याने त्यांच्या सुरक्षेला धोका आहेच. शिवाय झारखंडच्या जनतेच्या सुरक्षेलाही धोका आहे. झारखंडच्या जनतेची इज्जत आणि त्यांच्या मानसन्मानालाही धोका आहे, असं मरांडी यांनी म्हटलं आहे. तसेच सोरेन यांना शोधून देणाऱ्याला इनामही घोषित केला आहे. कोणताही विलंब न लावता जो कोणी मुख्यमंत्र्यांचा पत्ता सांगेल, मुख्यमंत्र्यांना सहीसलामत घेऊन येईल, त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिलं जाईल, असं बाबूलाल मरांडी म्हणाले.
अनेक तास वाट पाहिली
आपल्या पोस्टमध्ये मरांडी यांनी झारखंडच्या लोकांना मार्मिक अपील केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी सोरेन यांचा एक फोटोही छापला आहे. त्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बेपत्ता असं लिहिलंय. दरम्यान, रविवारी सोरेन दिल्लीत होते. भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी होणार होती. ईडीचे अधिकारी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण सीएम तिथे नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक तास सोरेन यांची वाट पाहिली. पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.
झारखंड के लोगों से मार्मिक अपीलः- हमारे राज्य के मुख्यमंत्री केन्द्रीय एजेंसियों के डर के मारे पिछले क़रीब चालीस घंटे से लोकलाज त्याग कर लापता हैं और चेहरा छिपाकर भागे-भागे फिर हैं।
यह न सिर्फ़ मुख्यमंत्री की निजी सुरक्षा के लिये ख़तरा है बल्कि झारखंड की साढ़े तीन करोड़ जनता की… pic.twitter.com/6QdNm5T0PS
— Babulal Marandi (@yourBabulal) January 30, 2024
पत्रात काय म्हटलंय?
दरम्यान, सीएम सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. येत्या 2 फेब्रुवारी रोजी बजेट सुरू होणार आहे. त्यामुळे आपण बजेटमध्ये व्यस्त आहोत, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 31 जानेवारीपूर्वीच साक्ष नोंदवून घेण्याचा ईडीचा आग्रह चुकीचा आहे. यावरून ईडीला सरकारच्या कामापासून वंचित ठेवायचं असून सरकारला आपल्या कर्तव्यापासून ईडीला रोखायचं आहे, असं यातून सिद्ध होतंय. हा राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.