विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का देणारी पहिली मोठी बातमी, अरविंद केजरीवाल यांची भूमिका बदलली?

विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का देणारी पहिली मोठी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्षांची आज पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रासह देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या बैठकीत उपस्थित होते. पण या बैठकीनंतर विरोधी पक्षांना अनपेक्षित असणारी बातमी समोर आली आहे.

विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का देणारी पहिली मोठी बातमी, अरविंद केजरीवाल यांची भूमिका बदलली?
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 9:33 PM

पाटणा : देशाच्या तब्बल 15 विरोधी पक्षांची आज एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा करण्यात आली. आपण सगळे एक आहोत आणि एकत्रितपणे पुढच्या निवडणुका लढवुयात या मतावर सर्वांच एकमत झालं. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर सर्वांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी सर्वांनी भूमिका मांडली. यावेळी सर्वांनी एकत्रिपणे पुढे जायचं ठरल्याचं सांगितलं. तसेच सर्व पक्षांची पुढच्या महिन्यात शिमल्यात पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं. त्यामुळे विरोधी पक्षांचा एकच सूर असल्याचं बघायला मिळालं. पण विरोधी पक्षांच्या या पहिल्याच एकजुटीच्या बैठकीला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

विरोधी पक्षांच्या पाटण्यातील आजच्या बैठकीला आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला सर्व मतभेद बाजूला सारुन एकत्र येण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उदाहरण दिलं. आम्ही 25 वर्ष एकमेकांना शिव्या दिल्या. पण आज एकत्र आलो, असं शरद पवार यांनी सांगितलं. पण त्यानंतरही अरविंद केजरीवाल यांचं मतपरिवर्तन झालेलं नसल्याचं बघायला मिळत आहे.

‘आप’ची नेमकी भूमिका काय?

आम आदमी पक्षाने विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आपली भूमिका जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या वादावर मोठा निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांचा बदल्यांचा अधिकार दिल्ली सरकारकडे दिला होता. पण केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या काही ओळींचा उल्लेख करत नवा अध्यादेश काढला होता.

हे सुद्धा वाचा

या अध्यादेशाच्या विरोधात दिल्ली सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे. तसेच या अध्यादेशाला काँग्रेस जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या पुढील बैठकींमध्ये सहभागी होणं कठीण आहे, ज्यामध्ये काँग्रेस सहभागी आहे, अशी भूमिका आम आदमी पक्षाने घेतली आहे.

काँग्रेसच्या 31 राज्यसभेच्या खासदारांनी या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत भूमिका मांडावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. विरोधी पक्षांच्या बैठकीत 15 पैकी 12 पक्षांचे राज्यसभेत प्रतिनिधी आहेत. त्यापैकी 11 पक्षांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे की, राज्यसभेत ते या अध्यादेशाला विरोध करणार. पण काँग्रेसने आपली भूमिका मांडलेली नाही. याउलट काँग्रेसच्या दिल्ली आणि पंजाब युनिट्सने घोषणा केली आहे की, या मुद्द्यावरुन पक्षाने भाजप सरकारचं समर्थन करावं, असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.