एकमेव पाकिस्तानी ज्यांचा भारतरत्नाने सन्मान, भारताचा सर्वोच्च सन्मान का दिला ?

bharat ratna award Update | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. पाकिस्तानी नागरिक ‘बादशाह खान’ यांनाही भारतरत्‍न देण्यात आला आहे. कोण आहे हे बादशाह खान आणि त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला?

एकमेव पाकिस्तानी ज्यांचा भारतरत्नाने सन्मान, भारताचा सर्वोच्च सन्मान का दिला ?
bharat ratna award
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 2:26 PM

नवी दिल्ली, दि.4 फेब्रुवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात माहिती दिली. अडवाणी आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे, असे मोदी यांनी म्हटले. काही प्रकरणात विदेशातील लोकांनाही भारतरत्न दिले गेले आहे. त्यात नेल्सन मंडेला आणि मदर टेरेसा यांचा समावेश आहे. परंतु पाकिस्तानी नागरिक ‘बादशाह खान’ यांनाही भारतरत्‍न देण्यात आला आहे. कोण आहे हे बादशाह खान आणि त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला.?

फाळणीचे होते दु:ख

भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. अनेकांना देशाचे दोन तुकडे झालेले आवडले नव्हते. त्यात खान अब्दुल गफ्फार खान होते. त्यांना बादशाह खान म्हणून ओळखले जात होते. ते महात्मा गांधींच्या मार्गावर जाऊन देशाची सेवा करत होते. स्वातंत्र्याच्या वेळी खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जात होते. त्यांची कर्मभूमी पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांना सर्वात जास्त त्रास झाला होता. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील पेशावरजवळील सुन्नी मुस्लिम कुटुंबात ६ फेब्रुवारी १८९० रोजी झाला होता.

फाळणीच्या विरोधात उभे राहिले

बादशाह खानचे वडील बैराम खान आणि आजोबा अब्दुल्ला खान यांच्याकडून त्यांना राजकीय लढण्याचे कौशल्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्यावेळी फाळणीची चर्चा सुरू झाली. परंतु सीमांत गांधी फळणीच्या विरोधात उभे राहिले. परंतु त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे त्यांनी पश्तूनांसाठी वेगळ्या देशाची मागणी केली. त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि फाळणीनंतर पाकिस्तानात त्यांचे घर असल्याने ते तेथे राहू लागले. फाळणीमुळे ते उद्ध्वस्त झाले, पण पाकिस्तानात राहून त्यांनी पश्तून अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा सुरूच ठेवला. त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात स्वतंत्र पश्तूनिस्तानची चळवळ चालू ठेवली. त्यामुळे पाकिस्तानने त्यांना देशद्रोही ठरवून अनेक वर्षे तुरुंगात डांबले. त्यानंतर ते अफगाणिस्तानला गेले.

हे सुद्धा वाचा

भारतरत्न मिळवणारे पहिले अभारतीय

भारत सरकारने 1987 मध्ये खान अब्दुल गफार खान यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले अभारतीय ठरले. आयुष्यभर अहिंसेचे पालन करणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचा अखेरचा प्रवास हिंसाचाराचा बळी ठरला. 20 जानेवारी 1988 रोजी त्यांचे निधन झाले. पेशावर त्यांची अंत्ययात्रा निघत असताना दोन स्फोट झाले.

हे ही वाचा…

भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.