Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहुबलीच्या मुलीचं लग्न; 50 क्विंटल नॉनवेज, 100 हून अधिक पक्वान्न, 3 लाख रसगुल्ल्यांनी करणार तोंड गोड

पटनामध्य हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सुरभी आणि राजहंसच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पटनामध्ये धूमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला बिहारच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

बाहुबलीच्या मुलीचं लग्न; 50 क्विंटल नॉनवेज, 100 हून अधिक पक्वान्न, 3 लाख रसगुल्ल्यांनी करणार तोंड गोड
बाहुबलीच्या मुलीचं लग्न; 50 क्विंटल नॉनवेज, 100 हून अधिक पक्वान्नImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 3:39 PM

पटना: बिहारचे माजी खासदार आणि बाहुबली नेता आनंद मोहन यांची मुलगी सुरभी आनंद आज (बुधवार) लग्नबंधनात अडकणार आहे. सुरभीची हळद आणि संगीताचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. सुरभीचं लग्न मुंगेरमधल्या राजहंस सिंहशी होणार आहे. पटनामध्य हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सुरभी आणि राजहंसच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पटनामध्ये धूमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला बिहारच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

आनंद मोहन यांच्या मुलीच्या लग्नासाठी 100 हून अधिक पक्वान्नांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 50 क्विंटल मांसाहाराचीही व्यवस्था केली आहे. लग्नात चिकन, मटण आणि माशांचेही विविध पदार्थ असतील. त्याचसोबत शाकाहारी पाहुण्यांसाठीही विविध पक्वान्नांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुलाब जामून, रसमलाई, रसगुल्ला यांसारख्या मिठाईंचाही लग्नाच्या मेन्यूमध्ये समावेश असेल. या लग्नसोहळ्यासाठी जवळपास तीन लाख रसगुल्ले बनवले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

आनंद मोहन यांच्या मुलीच्या लग्नासाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पटनाच्या बैरिया परिसरातील एका फार्ममध्ये याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या फार्ममध्ये कृत्रिम तलावसुद्धा बनवण्यात आले आहेत. या फार्मची क्षमता जवळपास 20 हजार लोकांची आहे.

कोण आहेत आनंद मोहन?

आनंद मोहन हे बिहारच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 1994 मध्ये मुजफ्फरपूरमध्ये गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी कृष्णैय्या यांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आधी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर ती शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. आनंद मोहन सिंह हे मूळचे बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील पचगछिया गावातील आहेत. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी होते.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.