बंगळुरुच्या इदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई, सुप्रीम कोर्टाचे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश
कर्नाटक हायकोर्टाच्या खंडपीठाने गणेशोत्सवाबाबतचा निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर गणेशोत्सवास परवागी देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात कर्नाटकच्या वक्फ बोर्डाने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
बंगळुरु – बंगळुरुच्या इदगाह मैदानात (Idgah Ground)गणेशोत्सव (Ganesh festival)साजरा करण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme court)मंगळवारी नकार दिला. कर्नाटक वक्फ बोर्डाच्या याचिकेवर सुनावणी करताना, या मैदानावर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. दोन्ही पक्षकारांनी यावर तोडगा काढण्यासाठी कर्नाटक हायकोर्टात जाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
#BREAKING Supreme Court halts the move of State Govt to allow #GaneshChaturthi celebrations in Idgah maidan in Bangalore. Orders that status quo as of today be maintained by both the Waqf Board & State Govt. Directs that issues be raised before the High Court.#SupremeCourt https://t.co/DNmNutnqly
हे सुद्धा वाचा— Live Law (@LiveLawIndia) August 30, 2022
सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी
कर्नाटक हायकोर्टाच्या खंडपीठाने गणेशोत्सवाबाबतचा निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर गणेशोत्सवास परवागी देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात कर्नाटकच्या वक्फ बोर्डाने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती यूयू ललित यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ तयार केले होते. त्यात इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती एस ओका आणि न्यायमूर्ती सुंदरेश यांचा समावेश होता.
Karnataka | We’ve deployed an adequate police force. SC judgment will be binding on all of us including the police. We will ensure that the status quo is maintained: Bengaluru Police Commissioner CH Pratap Reddy on SC order of maintaining status quo at Idgah maidan in Chamarajpet pic.twitter.com/gq2jBfIv6T
— ANI (@ANI) August 30, 2022
तीन दिवसांच्या गणेशोत्सवाला आधी दिली होती परवानगी
कर्नाटक हायकोर्टाच्या एका खंडपीठाने 26ऑगस्ट रोजी राज्य सरकारला निर्देश दिले गोते. त्यात त्यांनी इदगाह मैदान वापरण्याबाबत, बंगळुरु शहराच्या आयुक्तांना अर्जाचा विचार करुन योग्य निर्णय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हुबळी-धारवाड नगरपरिषदेने या ठिकाणी तीन दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
हुबळी-धारवाडचे महापौर इरेश अचंतगेरी यांनी बैठकीनंतर सोमवारी रात्री याची घोषमा केली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की सहा संघटनांनी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी याला विरोध केला होता.