तीन मोठ्या बँका दिवाळखोरीत, दोन ट्रिलियन डॉलर स्वाहा…भारतात मंदी येणार का?
Recession Probability in India : अमेरिकेतील तीन बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्याचा परिणाम जगभर होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंदीचे संकट घोंगावत आहे. आता भारतात काय परिस्थिती असणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सध्या अमेरिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. अमेरिका बँकिंग व्यवस्था सध्या संकटाशी झुंजत आहेत. दोन महिन्यांत देशातील तीन मोठ्या बँका बुडाल्या आहेत. 2008 नंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट मानले जात आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक गेल्या महिन्यात कोसळली आणि फर्स्ट रिपब्लिक बँक या महिन्यात दिवाळखोरीत निघाली आहे. दोन ट्रिलियन डॉलर स्वाहा झाले आहेत.
अमेरिकेत मंदीची भीती
1 जूनपर्यंत कर्जाची मर्यादा वाढवली नाही, तर अमेरिका इतिहासात पहिल्यांदाच डिफॉल्ट होईल, असा इशारा अर्थमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे देशात मंदीची भीती आणखी वाढली आहे. केवळ अमेरिकाच नाही तर युरोपातील अनेक मोठे देशही मंदीच्या भीतीखाली आहे. यामध्ये फ्रान्स, कॅनडा, इटली, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश आहे. याशिवाय कॅनडा, दक्षिण आफ्रिका, जपान, दक्षिण कोरिया, रशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्येही मंदीची भीती वाढली आहे.
भारतात मंदी येणार का?
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार (World of Statistics) भारतात मंदीची शक्यता नाही. जगभरातील मोठ्या देशांमध्ये भारत हा एकमेव देश आहे जिथे मंदीची शक्यता शून्य टक्के आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळत असल्याचे अलीकडील आकडेवारी पुष्टी देतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) या वर्षी देखील भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असे म्हटले होते. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. यासोबतच मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयही चार महिन्यांच्या वर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये बहुतांश वाहन कंपन्यांची विक्री मजबूत होती.
Recession probability forecast, 2023:
?? India: 0%?? Indonesia: 2%?? Saudi Arabia: 5%?? China: 12.5%?? Brazil: 15%?? Switzerland: 20%?? Spain: 25%?? Mexico: 27.5%?? South Korea: 30%?? Japan: 35%?? Russia: 37.5%?? Australia: 40%?? South Africa: 45%?? France: 50%??…
— World of Statistics (@stats_feed) May 2, 2023
कुठे येणार सर्वाधिक मंदी
यूकेमध्ये जगात मंदीची सर्वाधिक शक्यता ७५ टक्के आहे. यूकेच्या अर्थव्यवस्थेत अलीकडे खूप गोंधळ झाला आहे. तेथे महागाईने कळस गाठला आहे. या यादीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा मंदी येण्याची शक्यता ७० टक्के आहे. 65 टक्के भीतीसह अमेरिका सातव्या क्रमांकावर आहे. देशातील बँकिंग संकट आणि रोकड तुटवडा निर्माण होण्याची भीती यामुळे मंदीची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे.