लग्नासाठी बँकांनी सुरु केले कर्ज, एक कोटीपर्यंत लोन अन् व्याज मात्र…

marriage loan interest | भारतात लग्नाचे मार्केट आठ लाख कोटी असल्याचे केपीएमजीने म्हटले आहे. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत देशात २५ लाख लग्न होण्याचा अंदाज आहे. या लग्नांसाठी बँका आता कर्ज देऊ लागल्या आहे. त्यात एसबीआयसारख्या बँकेचाही समावेश आहे.

लग्नासाठी बँकांनी सुरु केले कर्ज, एक कोटीपर्यंत लोन अन् व्याज मात्र...
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 10:19 AM

नवी दिल्ली, दि. 7 जानेवारी 2024 | ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आयुष्यात या दोन गोष्टी जवळपास सर्वच जणांना कराव्या लागतात. मुलगा, मुलगी वयात आले की त्यांचे दोनाचे चार हात करणे हे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य असते. त्याचवेळी घर चांगले बांधण्याचे त्यांचे स्वप्न असते. घरासाठी होमलोन सहज मिळू लागले आहे. परंतु आता लग्नासाठी यापूर्वी पैशांची जुळवाजुळव करताना अनेक अडचणी येत होत्या. आता लग्नासाठी कर्ज बँकांनी सुरु केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पसर्नल लोन अनसिक्योर्ड म्हटले आहे. त्यानंतर अनेक बँकांनी लग्नासाठी एक कोटीपर्यंत कर्ज देणे सुरु केले आहे. लग्नासाठी कर्ज घेणारे ग्राहक वाढत आहेत.

काय आहेत अटी

लग्नासाठी कर्ज घेण्यासाठी बँकांनी काही अटी ठेवल्या आहेत. लग्नासाठी कर्ज घेताना वय २१ वर्ष पूर्ण असले पाहिजे. हे कर्ज फिटताना वय ६० वर्षांपेक्षा जास्त नको. त्यासाठी मासिक पगार कमीत कमी पंधरा हजार हवा. क्रेडीट स्कोर ७५० पेक्षा जास्त असला पाहिजे. हे कर्ज घेण्यासाठी आधारचा पुरावा लागणार आहे. घराचा पुरावा म्हणून वीज बिल, टेलिफोन बिल, आधार, मतदान कार्ड लागतो. मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट द्यावे लागते. नोकरीचा पुरावा आणि पगार पत्रक दिल्यास कर्ज मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

कोणत्या बँका देताय कर्ज

लग्नासाठी एक कोटीपर्यंत कर्ज काही बँका देत आहे. एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, टाटा कॅपिटल, एसबीआय आणि लँडिंगकार्ट या बँकांकडून कर्ज दिले जात आहे. त्यासाठी व्याजदार १०.४९ टक्क्यांपासून ३६ टक्क्यांपर्यंत आहे. हा व्याजदर सिबिल स्कोरवर अवलंबून आहे. सिबिल स्कोर चांगला असले तर व्याज कमी लागते. एक ते सात वर्ष कर्ज फेडण्याचा कालावधी दिला आहे. भारतात लग्नाचे मार्केट आठ लाख कोटी असल्याचे केपीएमजीने म्हटले आहे. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत देशात २५ लाख लग्न होण्याचा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.