बेळगाव महानगरपालिकेत भाजपची खेळी, बसवला मराठी महापौर

सोमवारी निवडणूक असल्यामुळे पालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी भगवा फेटा बांधला होता. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी दिल्या.

बेळगाव महानगरपालिकेत भाजपची खेळी, बसवला मराठी महापौर
बेळगाव महानगरपालिकाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 3:41 PM

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या (belgaum mahanagar palika) महापौर, उपमहापौर पदाची निवड सोमवारी झाली. महापौरपदी मराठी नगरसेवक शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड झाली. बेळगाव महानगर पालिकेत सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. भारतीय जनता पक्षाकडे अनेक कन्नड संघटनांनी कन्नड उमेदवार महापौरपदी द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु भाजपने मराठी उमेदवारालाच दोन्ही पदे देत कन्नड संघटनांना धक्का दिला. या निवडीनंतर बेळगावमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. कर्नाटक भाजपने केलेल्या या खेळीचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे.

महापौर शोभा सोमना

भाजप कोअर कमिटीच्या घोषणेनंतर महापौरपदी भाजपच्या शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड केली. सोमवारी निवडणूक असल्यामुळे पालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी भगवा फेटा बांधला होता. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी दिल्या.

ही नावे होती चर्चेत

हे सुद्धा वाचा

महापौर पदासाठी सारिका पाटील, शोभा सोमना आणि वाणी जोशी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर उपमहापौर पदासाठी वैशाली भातकांडे यांनी अर्ज भरला होता. महापौरपदी शोभा सोमानेचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव निश्चित झाले.

उपमहापौर रेश्मा पाटील

पक्षीय मुद्यावर निवडणूक

भाषिक मुद्द्यावर होणारी निवडणूक यावेळी पक्ष मुद्द्यावर झाली असल्याने आता पक्षीय राजकारणाचे चित्र बेळगाव महानगरपालिकेच्या दिसणार आहे. महानगरापालिकेत भाजप बहुमतात होता. त्यामुळे भाजप ठरवले तोच महापौर होणार होता. आता काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता कोण असणार हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.

महापौराच्या एकंदर कामकाजाला योग्य कक्षेत आणण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची ठरणार असते. बेळगाव महानगरपालिका सभागृहात यापुढील काळात कोणत्या पद्धतीने राजकारण चालणार याचे संकेत आताच मिळू लागले आहेत. परंतु काँग्रेसनेही भाजप प्रमाणे मराठी उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे.

सीमावादावर शाहांची मध्यस्थी

दोन महिन्यांपुर्वी तापलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक घेतली होती. बैठकीत जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने कोणताही दावा केला जाणार नाही, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.