AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममतादीदींना झटका, आणखी एक आमदार भाजपमध्ये; आतापर्यंत 11 नेत्यांची टीएमसीला सोडचिठ्ठी

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. (Bengal election 2021: Another TMC MLA Dipak Haldar joins BJP)

ममतादीदींना झटका, आणखी एक आमदार भाजपमध्ये; आतापर्यंत 11 नेत्यांची टीएमसीला सोडचिठ्ठी
Mamata Banerjee
| Updated on: Feb 02, 2021 | 6:56 PM
Share

कोलकाता: निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. टीएमसीचे आमदार दीपक हल्दर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. (Bengal election 2021: Another TMC MLA Dipak Haldar joins BJP)

दीपक हल्दर हे डायमंड हार्बर येथील आमदार आहेत. त्यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत कुरबुरीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हल्दर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच आमदार असतानाही सत्ताधारी पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये येत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

46 दिवसात 11 नेते बाहेर

हल्दर यांच्यामुळे टीएमसी सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या 46 दिवसात 11 नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे टीएमसीचे धाबे दणाणले आहेत. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यावेळीही टीएमसीमधून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील, असं सांगितलं जात आहे.

युवा मोर्चा अध्यक्षही भाजपमध्ये येणार?

टीएमसीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष हिरेन चॅटर्जी हे सुद्धा भाजपमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना हिरेन चॅटर्जी यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. टीएमसीने केवळ आपला वापर केलाय, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे तेही भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गळती सुरूच

तृणमूलमध्ये राजकीय घडामोडी घडत असतानाच ममता बॅनर्जी यांचे अत्यंत खास असलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी 19 डिसेंबर रोजी 10 आमदारांसह पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यात पाच आमदार टीएमसीचे होते. अधिकारी यांनी केलेल्या या बंडानंतर टीएमसीमधील असंतोष चव्हाट्यावर आला. अनेक नेत्यांनी खुलेआम पक्षाविरोधात भाष्य करण्यास सुरुवात केली. तर काही नेत्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. 21 जानेवारी रोजी शांतीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी आणि 30 जानेवारी रोजी माजी मंत्री राजीब बॅनर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी कोलकात्याहून विशेष विमानाने दिल्लीत येऊन टीएमसीच्या पाच बंडखोर आमदारांसह पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात राजीब बॅनर्जी, प्रबीर घोषाल, वैशाली डालमियांचा समावेश होता. या शिवाय हावडाचे माजी महापौर रतीन चक्रवर्ती आणि पार्थ सारथी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Bengal election 2021: Another TMC MLA Dipak Haldar joins BJP)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्रीजी, तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, आपच्या खासदाराचा सवाल

एमपी गजब है! ‘गोमूत्र फिनाईल’नेच ऑफिस साफ करण्याचा आदेश! बाबू लोकांसमोर धर्मसंकट

ममतांच्या पोस्टरवरील गुटख्याची पिचकारी भाजप नेत्यानं पुसली, काट्याची टक्कर असलेल्या बंगालमध्ये दिलासादायक चित्र

(Bengal election 2021: Another TMC MLA Dipak Haldar joins BJP)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.