Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेविरोधात भारत बंदची घोषणा! GRP,RPF हाय अलर्टवर, डिजिटल पुरावे गोळा केले जाणार,कारवाई होणार…

आता आज भारत बंदच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा अत्यंत दक्ष आहेत. इतकंच काय तर विरोध करताना जर हिंसाचार झाला तर हिंसाचार कारण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेविरोधात भारत बंदची घोषणा! GRP,RPF हाय अलर्टवर, डिजिटल पुरावे गोळा केले जाणार,कारवाई होणार...
अग्निपथ योजनेविरोधात भारत बंदची घोषणा!Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 7:52 AM

नवी दिल्ली: अग्निपथ योजने (Agneepath Scheme) वरून काही संघटनांनी भारत बंदची घोषणा केलये. या घोषणेमुळे आरपीएफ आणि जीआरपी हाय अलर्टवर आहेत. योजनेविरोधात देशातील काही भागातून विरोध करण्यात येतोय, आंदोलनं करण्यात येतायत. काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडलेल्या आहेत.आंदोलकांनी (Protest) सर्वात जास्त नुकसान रेल्वेचं केलंय. आता आज भारत बंदच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा अत्यंत दक्ष आहेत. इतकंच काय तर विरोध करताना जर हिंसाचार झाला तर हिंसाचार कारण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हिंसाचार (Violence) करणाऱ्यांवर बयोनेट कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. कारवाई करण्यासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्याचे देखील आदेश देण्यात आलेत.

बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार

भारत बंदच्या घोषणेनंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलंय. जर कोणत्याही निदर्शकाने हिंसा केली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भारत बंददरम्यान प्रत्येक हालचालींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाईल. यासोबतच मोबाइल, कॅमेरा, सीसीटीव्हीच्या माध्यमातून हिंसा करणाऱ्यांविरोधात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘सुरक्षा गिअर घाला’

जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे संशयितांवर संबंधित कलमांखाली कारवाई केली जाईल. भारत बंददरम्यान होणाऱ्या हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन, ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुरक्षा साधने घालण्यास सांगितलंय. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नका अशा सूचनाहीदेण्यात आल्यात.

हे सुद्धा वाचा

‘संवेदनशील स्थानकांना वारंवार भेटी द्या’

आरपीएफला अंतर्गत संचाराच्या माध्यमातून अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलंय. त्याचबरोबर संवेदनशील स्थानकांना वारंवार भेटी देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या काळात सर्व अधिकारी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाशीही संपर्कात राहणार आहेत. कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल.

उपद्रवी लोकांवर करडी नजर ठेवली जाईल

सर्व अधिकाऱ्यांनी जनतेत जावे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असे आरपीएफने म्हटले आहे. टवाळखोरांवर करडी नजर ठेवा. यासोबतच परिसरात फ्लॅग मार्च करत राहा. प्रत्येक घटनेचे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करा जेणेकरून गरज पडल्यास नंतर त्याचा वापर करता येईल.

प्रत्येक घटनेसाठी स्वतंत्र गुन्हे

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी उपद्रव निर्माण केला किंवा गाडी थांबवली तर फौजदारी प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात येईल. एखादी घटना घडल्यास जीआरपी आणि स्थानिक पोलीस प्रत्येक घटनेसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करतील. इतकंच नाही तर एका स्टेशनवर एकापेक्षा जास्त आंदोलनं झाली तर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील.

व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचे पुरावे वापरले जातील

हिंसाचाराच्या प्रकरणांची बारकाईने चौकशी केली जाईल, कायदेशीर कारवाई अडकणार नाही किंवा वळवली जाणार नाही, असे आरपीएफने म्हटले आहे. गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या प्रत्येक आरोपीची ओळख पटवली जाईल. यात ज्यांनी हिंसाचाराचा कट रचला असेल किंवा लोकांना भडकवले असेल अशा सर्वांचा समावेश असेल. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या पुराव्यांचा वापर केला जाईल.

अनुभवी अधिकारी करणार प्रकरणांची चौकशी

आरपीएफने सांगितले की, प्रत्येक तक्रारीची उच्च स्तरावर चौकशी केली जाईल जेणेकरून त्यात कमतरता राहणार नाही. या प्रकरणाची चौकशी अनुभवी तपास अधिकाऱ्याने (आयओ) करावी, जेणेकरून समाजकंटकांवर कठोर कारवाई होईल. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणात सबळ पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे.

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.