Bhopal Hospital Fire: लग्नाच्या 12 वर्षानंतर मूल झाले आणि आगीत गमावले! एकूण 7 मुलांचा मृत्यू
मरण पावलेल्या मुलांची संख्या 7 वर पोहोचली आहे. मात्र सरकारी नोंदीमध्ये आतापर्यंत केवळ 4 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर शवागारात 7 मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सोमवारी रात्री नऊ वाजता कमला नेहरू हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली होती.
भोपाळमधील हमीदिया कॅम्पसमधील कमला नेहरू हॉस्पिटलला लागलेल्या आगीत मरण पावलेल्या मुलांची संख्या 7 वर पोहोचली आहे. मात्र सरकारी नोंदीमध्ये आतापर्यंत केवळ 4 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर शवागारात 7 मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सोमवारी रात्री नऊ वाजता कमला नेहरू हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांनी सरकारवर हल्लाबोल करत आकडे लपवण्याचा खेळ सुरू असल्याचे सांगितले. या घटनेबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. (Bhopal hospital Hamidiya Hospital Kamala Nehru Children ward fire total 7 dead baby born after 12 years of marraige dies)
कुटुंबीयांंचा आरोप मृत्यू 4 पेक्षा जास्त
या घटनेत 4 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली असली तरी ही आकडेवारी यापेक्षा जास्त असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्या सर्व कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रात्री 2.30 वाजल्यापासून मंगळवारी पहाटेपर्यंत रुग्णालय व्यवस्थापनाने अनेक कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मात्र, कुटुंबांच्या आरोपावर मंत्री विश्वास सारंग म्हणतात की, 4 मुलांचाच मृत्यू झाला आहे आणि उर्वरितांवर उपचार सुरू आहेत.
लग्नाच्या 12 वर्षानंतर मूल झाले आणि आगीत गमावले
कमला नेहरू हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत इरफान नावाच्या बाळाचा मृत्यू झाला. या अपघातात पीडित महिला इराणा हिने आपले मूल गमावले आहे. लग्नाच्या 12 वर्षानंतर तिला 2 नोव्हेंबरला मूल झाले. बाळाला जन्मापासूनच श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळेच त्याला हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले.
रात्री नऊ वाजता आग लागल्यावर कुटुंबीयांना रुग्णालयात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे लोकांनी बाहेर उभे राहून आरडाओरडा सुरू केला. पहाटे चार वाजता रुग्णालयाचे बाहेरचा गेट उघडण्यात आला आणि चार मुलांचे मृतदेह दाखवले गेले, त्यात 1 मुलगा इरणाचा होता, मुलाची ही अवस्था पाहून ती बेशुद्ध झाली. ती हॉस्पिटलबाहेर रडत राहिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयातून घरी नेले. इरफानला 2 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Bhopal fire: कमला नेहरू हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग, चार मुलांचा मृत्यू#Bhopal #BhopalFireinChildrenWard #ShivrajSingh https://t.co/5TsLuw9QIz
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021
Other News