Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, प्रत्येक संकटात पाठिशी उभ्या राहणाऱ्या भारताचा गौरव!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान सरकारने भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत भूतानच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. त्यासाठीच हा गौरव केला जातोय.
भारताचा शेजारी देश भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भूतान देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने (Highest civilian Award) सन्मानित केले आहे. भूतानचे पंतप्रधान लोटे शेरींग यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. कोरोनासारख्या जागतिक संकटात भारताने भूतानला (Bhutan) हरतऱ्हेची मदत केली. त्यामुळेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सहाकार्य या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. इतरही अनेक आघाड्यांवर भारताने नेहमी भूतानची साथ दिली आहे. म्हणूनच भूतानवासियांकडून शुभेच्छा देत तेथील पंतप्रधानांनी या पुरस्काराची घोषणा केली असून तो स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भूतानमध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे.
भूतानच्या PMO चे ट्विट
भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने जारी ट्विटरवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. फेसबुकवरदेखील भूतानच्या पीएमओने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आतापर्यंतच्या सर्व भेटींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान व्यक्ती आणि आध्यात्मिक व्यक्ती वाटले. भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्याच्या पुरस्कारात आपण उपस्थित रहावे, अशी आशा करतो.
Overjoyed to hear His Majesty pronounce Your Excellency Modiji’s @narendramodi name for the highest civilian decoration, Order of the Druk Gyalpo.https://t.co/hD3mihCtSv@PMOIndia @Indiainbhutan pic.twitter.com/ru69MpDWlq
— PM Bhutan (@PMBhutan) December 17, 2021
कोरोना संकटात भारताची मोठी साथ
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना काळात भारताने भूतानची मोठी मदत केली. एअर इंडियाच्या विमानांनी ऑक्सफर्ड- अॅस्ट्राजेनेकाच्या कोव्हिशील्ड या लसींचे लाखो डोस भारतातून भूतानला पाठवण्यात आले. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काही खेपांचे पैसेही भारताने भूतानकडून घेतले नव्हते. याच लसींद्वारे भूतानमधील लोकांचे लसीकरण झाले. डोंगराळ भागात वसलेल्या या देशात भारताने मोफत लस पाठवल्याने तेथील नागरिकांना सुरक्षा कवच मिळाले. तेथील राजा आणि प्रशासक जिग्मे खेसर नामगयेल वांगचूक यांच्या नेतृत्वात प्रभावी लसीकरण राबवण्यात आली. बर्फाळ प्रदेश, गोठलेल्या नद्यांतूनही त्यांनी अत्यंत दुर्गम भागात लसीकरण केले. या सर्वांमुळे भूतान कोरोना संकटातून बहुतांश प्रमाणात सावरला आहे. या सहकार्यासाठी कृतज्ञता म्हणून भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार यंदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.
इतर बातम्या-