Bihar Kidnapping : बिहारमध्ये मुलांचे अपहरण करून किन्नर बनवणारी टोळीचा पर्दाफाश

ही टोळी अतिशय हुशारीने आपले काम करत होती, ज्याची माहिती जाणून पोलीसही हैराण झाले आहेत. लखीसराय जिल्ह्यातील किउल पोलीस स्टेशन परिसरात नपुंसक बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे लोक मुलांचे अपहरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे लिंग बदलायचे.

Bihar Kidnapping : बिहारमध्ये मुलांचे अपहरण करून किन्नर बनवणारी टोळीचा पर्दाफाश
नागपुरात कुत्र्यांना मारून जाळले.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 5:16 PM

बिहार : मुलांचे अपहरण (Kidnapping) करुन त्यांचे लिंग (Gender) बदल करुन त्यांना किन्नर बवणाऱ्या टोळीचा बिहार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका किन्नरला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. चांदतारा असे अटक करण्यात आलेल्या किन्नरचे नाव आहे. चांदतारा हा दिसायला चांगले असणाऱ्या मुलांचे अपहरण करायचा आणि त्यांचे ऑपरेशन करुन लिंग बदलून त्यांना किन्नर बनवायचा. त्यानंतर भीक मागायला लावायचा. नुकतेच त्याने 10 वर्षाच्या दोन मुलांचे अपहरण केले होते. या मुलांचा शोध घेत असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ही टोळी अतिशय हुशारीने आपले काम करत होती, ज्याची माहिती जाणून पोलीसही हैराण झाले आहेत. लखीसराय जिल्ह्यातील किउल पोलीस स्टेशन परिसरात नपुंसक बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे लोक मुलांचे अपहरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे लिंग बदलायचे. (Bihar police exposes gang of kidnapping children and made transgender)

मुलांचे लिंग बदल करुन किन्नर बलवले जायचे

पोलिसांनी सांगितले की, नुकतेच दहा वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांना किन्नर बनवल्याची घटना समोर आली आहे. ही टोळी चांदतारा नावाची किन्नर चालवत होती. किउल पोलीस स्टेशन हद्दीतील वृंदावन येथे राहणाऱ्या अजय पासवान यांचा 10 वर्षाचा मुलगा हा आर्थिक विवंचनेमुळे भाजीपाला विकायचा. यादरम्यान चांदताराची नजर त्याच्यावर पडली. कुंदन दिसायला चांगला होता. त्यानंतर चांदताराने त्याला आमिष दाखवून आपल्या घरी आणले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा प्रायव्हेट पार्ट काढून त्याला नपुंसक बनवले. मग तो मुलगा चांदताराकडे भीक मागू लागला.

याप्रकरणी कसून तपास सुरु आहे : एसपी

पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाने चांदताराला विरोध केल्यानंतर तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या घटनेत, दिनेश यादव यांच्या मुलाला दोन वर्षांपूर्वी चांदताराने नेले आणि ऑपरेशन करून त्याला नपुंसक बनवले. हा मुलगा ट्रेनमध्ये आणि सिग्नलवर भीक मागतो. मात्र चांदताराने सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असे चांदताराचे म्हणणे आहे. या प्रकरणी कसून तपास करीत आहे. तपास पूर्ण होताच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे एसपी सुशील कुमार यांनी सांगितले. (Bihar police exposes gang of kidnapping children and made transgender)

इतर बातम्या

Aurangabad | तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना

Pune crime : तिकीट काढलं कोलकात्याचं, रवानगी थेट तुरुंगात! महागड्या सायकल चोरणाऱ्यांना पुण्यातील स्वारगेट पोलिसांचा हिसका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.