Cyclone Biparjoy : बिपरजॉय सुपर होतोय सायक्लोन, 100 ते 150 KM हवेचा वेग किती घातक

Gujarat Strong winds : गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार आहे. प्रचंड वेगाने त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीकडे सुरु आहे. या वादळामुळे लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूर्ण अलर्टवर आहे.

Cyclone Biparjoy : बिपरजॉय सुपर होतोय सायक्लोन, 100 ते 150 KM हवेचा वेग किती घातक
cylone
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 5:21 PM

नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच गुजरातमध्ये धडकणार आहे. आता हे वादळ गुजरातच्या किनारी जिल्ह्यांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सध्या बिपरजॉय जखाऊ बंदरापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 110 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूर्ण अलर्टवर आहे. वादळापूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्वारकेतील सुमारे 38 गावांमध्ये झाडे उन्मळून पडली आहेत.

गुजरातमध्ये काय सुरु

गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 50 किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. अनेक कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, जिथे वादळाचा धोका सर्वाधिक आहे, तिथे सर्वत्र लष्कर आणि एनडीआरएफचे जवान तैनात आहेत. अनेक भागात समुद्राचे पाणी शिरल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आता ऑरेंज अलर्टचे रेड अलर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

किती धोकादायक आहे हवा

चक्रीवादळ दरम्यान हवेचा वेगासंदर्भातील गणित भारतीय हवामान विभागाने दिले आहे.

  • 31 किलोमीटर प्रतितासापेक्षा कमी वेगाने हवा असल्यास ते प्रेशर सायक्लोन असते.
  • 31 ते 49 किलोमीटर प्रतितास हवेचा वेग असल्यावर ते डिप्रेशन असते.
  • 49 ते 61 किलोमीटर प्रतितास हवेचा वेग असल्यावर ते डीप डिप्रेशन असते.
  • 61 ते 88 वेग असल्यावर सायक्लोनिक स्टॉर्म म्हटला जातो.
  • 88 ते 117 हवेचा वेग असल्यावर सिव्हियर सायक्लोनिक स्टॉर्म असते.
  • 121 किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त हवेचा वेग असल्यावर सुपर सायक्लोन म्हटले जाते. म्हणजे आता बिपरजॉय सुपर सायक्लान झाला आहे.

किती घातक असतो हवेचा वेग

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर असेल. एवढ्या जोराच्या वाऱ्यामुळे नुकसान होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 150 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी कार कुठेतरी आदळली की आत बसलेली व्यक्ती वाचत नाही, यावरुनच हवेचा वेग लक्षात येतो.

बिपरजॉय काय आहे?

अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले. बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले.

यंदा बांगलादेशने दिले नाव

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, ओमान आणि मालदीव यांनी वादळांच्या नावांची यादी जागतिक हवामान संघटनेला दिली आहे. या देशांमध्ये कुठेतरी वादळ आले की त्या नावांवरून एक नाव निवडले जाते. यावेळी नाव ठेवण्याची पाळी बांगलादेशची असल्याने बांगलादेशने ‘बिपरजॉय’ असे नाव दिले. ही यादी पुढील 25 वर्षांसाठी तयार करण्यात आली आहे. 25 वर्षांपासून बनवलेली ही यादी तयार करताना दरवर्षी किमान पाच चक्रीवादळे होतील असे गृहीत धरले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.